शनिवार, ५ सप्टेंबर, २०२६

कुराश खेळाच्या बनावट प्रमाणपत्रांवर ५ टक्के क्रीडा आरक्षणातून सरकारी नोकऱ्या; पुणे गुन्हे शाखेकडून दोघांना अटक


पुणे (विशेष प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 'कुराश' या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा न घेता बनावट प्राविण्य प्रमाणपत्रे वाटून शासकीय नोकरीत ५ टक्के क्रीडा आरक्षण मिळवून देणाऱ्या मोठ्या गैरप्रकाराचा पुणे पोलीस गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात (गु.र.नं. २३७/२०२६) गुन्हे शाखेने ३ सप्टेंबर २०२६ रोजी दोघांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिवाजी जयवंत साळुंखे (वय ४६ वर्ष, रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे) आणि अंकुश विठ्ठल नागर (वय ४० वर्ष, सध्या रा. चंदीगड, मूळ रा. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३३८, ३३६(३), ३४०(२), ३३९, ६१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे आलेल्या एका गोपनीय अर्जाची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

तपासात उघड झाले की, २०१६ ते २०१९ या कालावधीत भारतीय कुराश असोसिएशनशी संलग्न नसलेल्या एका असोसिएशनने स्पर्धा आयोजित केल्याचे दाखवले. त्यांच्या प्रमाणपत्रांवर पदाधिकाऱ्यांच्या स्कॅन केलेल्या स्वाक्षऱ्या टाकून बोगस प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच २०१६ ते २०२२ या कालावधीतील स्पर्धांचे बनावट रेकॉर्ड तयार करण्यासाठी महाराष्ट्र कुराश असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा संघटनांकडून मागील ९ ते १० वर्षांपूर्वीच्या तारखांची खोटी सहभाग पत्रे (Participation Letters) बनवून घेतली. ही कागदपत्रे क्रीडा संचालनालयाकडे सादर करून पडताळणी करून घेण्यात आली, ज्यामुळे खऱ्या खेळाडूंवर अन्याय होऊन बनावट खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला.

गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध घेत असून, या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


  • Labels: Sports Scam, Fake Certificate Fraud, Kurash Sport Scam, Pune Police, Crime Branch Pune, MPSC Sports Quota

  • Search Description: Pune Crime Branch exposes a major sports racket where fake Kurash sport certificates were used to claim 5% government job quota; two arrested.

  • Hashtags: #SportsScam #FakeCertificate #MPSC #PunePolice #JobFraud #CrimeBranch


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा