मुलीच्या आवाजात बोलायचा अन् 'प्रिन्सिका' बनून लुटायचा; पुण्यातील उच्चशिक्षित तरुणाचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश





पुणे (विशेष प्रतिनिधी): स्नॅपचॅटवर 'प्रिन्सिका जोशी' या नावाने मुलीचे बनावट प्रोफाईल तयार करून आणि फोनवर हुबेहूब मुलीच्या आवाजात बोलून तक्रारदाराची १ लाख ५० हजार रुपयांची क्रिप्टो फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाचा सायबर पोलीस ठाण्याने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी कुणाल जितेंद्र आदमाने (वय २५ वर्ष, रा. पर्वती परिसर, पुणे) याला ३१ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१९(२), ३१८(४) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी), ६६(डी) नुसार गुन्हा (गु.र.नं. १०९/२०२६) दाखल आहे.

तक्रारदारास स्नॅपचॅटवर "प्रिन्सिका जोशी" या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती स्वीकारल्यानंतर आरोपीने पुढील ६ ते ७ महिने स्नॅपचॅट चॅटिंगसह मोबाईल फोनवर नियमित मुलीच्या आवाजात संवाद साधून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. आरोपीने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असल्याने तो आवाजात सहज बदल करत असे. विश्वास निर्माण झाल्यानंतर आरोपीने क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. तक्रारदाराने वेळोवेळी स्वतःच्या क्रिप्टो वॉलेटमधून १४६८ USDT (सुमारे १.५० लाख रुपये) हस्तांतरित केले.

काही कालावधीनंतर तक्रारदाराने गुंतवणुकीचा परतावा व मुद्दल परत मागण्यास सुरुवात केली असता आरोपीने स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम अकाउंट बंद करून संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून कुणाल आदमानेला ताब्यात घेतले. त्याने अशा प्रकारे आणखी किती जणांना लुटले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचे आणि संशयास्पद प्रकार घडल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते व पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक शरद शेळके, अंमलदार कृष्णकांत देसाई, बाळासाहेब चव्हाण, जान्हवी बढेकर, रवींद्र साळवे, संदीप मुंढे, संदीप कारकूड, सुप्रिया होळकर, कृष्णा मारकड, श्रीकृष्ण नागटीळक व सोनाली चव्हाण यांनी केली.


  • Labels: Cyber Crime Pune, Snapchat Fraud, Crypto Scam, Pune Police Cyber Cell, Kunal Admane, Online Fraud

  • Search Description: Pune Cyber Police arrests 25-year-old Kunal Admane who mimicked a female voice as 'Prinsika' on Snapchat to defraud a man of Rs 1.5 lakh via crypto.

  • Hashtags: #CyberCrime #SnapchatScam #CryptoFraud #PunePolice #CyberSecurity #OnlineSafety

मुलीच्या आवाजात बोलायचा अन् 'प्रिन्सिका' बनून लुटायचा; पुण्यातील उच्चशिक्षित तरुणाचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश मुलीच्या आवाजात बोलायचा अन् 'प्रिन्सिका' बनून लुटायचा; पुण्यातील उच्चशिक्षित तरुणाचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश Reviewed by ANN news network on ९/०५/२०२६ ०२:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".