गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

फरार आरोपी अतिष मोरेला पुणे गुन्हेशाखेकडून अटक

 


पुणे, १० सप्टेंबर २०२६: पिस्तुलाचा वापर करून प्राणघातक हल्ला करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील पसार आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. अतिष उमेश मोरे (वय २९, रा. १३०, दांडेकर पूल, सिंहगड रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आंबेगाव पोलीस ठाण्यात ५ सप्टेंबर २०२६ रोजी गु.र.नं. ३८०/२०२६, भारतीय न्याय संहिता १०९(१), १८९, १९०, १९१(१), ३५१(३) सह आर्म्स ॲक्ट ३(२५), ३(२७), महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१)(३) सह १३५ व क्रिमिनल लॉ ॲमेंडमेंट ॲक्ट कलम ७ अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अतिष मोरे हा स्वतःचे अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी पसार होऊन फिरत होता.

पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांतील फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी युनिट-२ चे पथक कार्यरत असताना, ९ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी आणि महेश मंडलिक यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, फरार आरोपी अतिष मोरे हा आंबेगाव दरी पुलाजवळील परिसरात आला आहे.

या बातमीची खात्री करून गुन्हे शाखा युनिट प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या आदेशानुसार पथकाने तात्काळ आंबेगाव दरी पुलाजवळ सापळा रचला. पथकाने अतिष मोरे यास घेराव घालून ताब्यात घेतले आणि आंबेगाव पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात त्याला अटक केली.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, निरीक्षक अविनाश माने, सहायक निरीक्षक स्वप्नील लोहार, उपनिरीक्षक तेजश्री पवार आणि अंमलदार उज्ज्वल मोकाशी, महेश मंडलिक, शंकर नेवसे, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, कुंदन शिंदे, संतोष टकले, शंकर कुंभार, आशिष यादव, विनायक वगारे तसेच साधना ताम्हाणे व विद्या शिंदे यांनी पार पाडली.

  • Labels: Pune Crime Branch, Atish More Arrested, Ambegaon Murder Attempt, Arms Act Case, Pune Police, Crime News Pune

  • Search Description: Pune Crime Branch Unit-2 arrested absconding criminal Atish Umesh More from Ambegaon Dari Bridge in a firing and attempt to murder case.

  • Hashtags: #PunePolice #CrimeBranch #AmbegaonPolice #ArmsAct #PuneCrime #LawAndOrder #PoliceAction

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा