२१ ऑगस्टपर्यंत H1N1 चे १,१०९ रुग्ण; डेंग्यूचे ५,५५८ रुग्ण नोंद
पुणे, दि. ७ सप्टेंबर : महाराष्ट्रात H1N1 आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने नागरिकांनी मोसमी संसर्गांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लक्षणे कायम राहिल्यास किंवा तीव्र होत असल्यास वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्यावर कंपनीने भर दिला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या आकडेवारीचा संदर्भ देत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत राज्यात H1N1 चे १,१०९ रुग्ण नोंदवले गेले आहेत. हा आकडा २०२५ मध्ये संपूर्ण वर्षात नोंदलेल्या ९४२ रुग्णांपेक्षा अधिक आहे. तसेच १ जानेवारी ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत डेंग्यूचे ५,५५८ रुग्ण नोंदवले गेले असून, मागील वर्षातील याच कालावधीतील ४,३४४ रुग्णांच्या तुलनेत ही संख्या १,२१४ ने अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. H1N1 रुग्णांपैकी मुंबईत ४८८ आणि पुण्यात २४१ रुग्णांची नोंद झाल्याचेही प्रसिद्ध माहितीत नमूद आहे.
ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, उलट्या, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा डिहायड्रेशनसारखी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींनी स्वतः निदान किंवा औषधोपचार न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे कंपनीने म्हटले आहे. वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, घराभोवती पाणी साचू न देणे आणि डासांपासून संरक्षण यांसारख्या प्रतिबंधात्मक उपायांवरही भर देण्यात आला आहे.
Labels:
Maharashtra, H1N1, Dengue, Health Alert, Monsoon Health, Seasonal Infections, Public Health, Star Health, Health News, Maharashtra HealthSearch Description:
Maharashtra sees rising H1N1 and dengue cases. Star Health urges citizens to watch symptoms, prevent infections and seek timely medical advice.Hashtags:
#Maharashtra #H1N1 #Dengue #HealthAlert #MonsoonHealth #HealthNews #StarHealth #PublicHealth #MaharashtraNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: