महाराष्ट्रात सध्या काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असून त्यांना सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगत बन म्हणाले की, "संजय राऊत यांना शेतकऱ्यांशी किंवा मराठवाड्याच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. दरवर्षी १७ सप्टेंबर जवळ आला की मराठवाड्यात जाऊन नौटंकी करायची हा त्यांचा जुना धंदा आहे."
"रोहित पवार आणि संजय राऊत यांच्या पोटात का दुखतेय?"
अंमलबजावणी संचालनालयातील (ED) नवीन अधिकाऱ्यांच्या भरतीवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना नवनाथ बन यांनी थेट सवाल उपस्थित केला. "ईडीच्या अधिकाऱ्यांची भरती होत असेल तर संजय राऊत आणि रोहित पवार यांच्या पोटात का दुखतेय? नवीन भरती झाल्यानंतर ईडीचे अधिकारी बारामती ॲग्रोवर कारवाई करतील अशी भीती रोहित पवार यांना वाटत आहे का?" असा सवाल त्यांनी केला. तसेच, पत्राचाळ घोटाळ्यात हजारो कोटी रुपये लुटल्यामुळे संजय राऊत यांना पुन्हा आर्थर रोड तुरुंगात जावे लागेल या भीतीने ते ईडीच्या जाहिरातीला घाबरत असल्याचे बन यांनी स्पष्ट केले. जे चुकीचे काम करतात त्यांच्यावरच ईडी कारवाई करते, त्यामुळे निष्पाप असाल तर घाबरण्याचे कारण नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.
महाविकास आघाडीच्या काळातील प्रकरणांची आठवण
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावर निशाणा साधताना बन म्हणाले, "मविआ काळात पालघर येथील साधू हत्याकांडासाठी नेमलेल्या एसआयटी चौकशीचे काय झाले? पत्रकारांच्या अटकेबाबत काय चौकशी झाली? आणि उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकांच्या चौकशीचे काय निष्पन्न झाले? असे शेकडो प्रश्न जनता आज विचारत आहे." महायुती सरकारच्या काळात कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जात नाही, मग ते पेपरफुटी प्रकरण असो वा अन्य कोणताही गैरप्रकार, असा दावा त्यांनी केला. "तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सचिन वाझे काय लादेन आहे का?' असे म्हणत गुन्हेगारांचे समर्थन केले होते. विरोधकांना एसआयटी (SIT) नव्हे तर फक्त काळा पैसा साचवण्यासाठी 'एसआयपी' (SIP) समजते," असा टोलाही त्यांनी लगावला.
मुंबई महापालिका सेवेसाठी, घर भरण्यासाठी नाही
मुंबई महापालिका बरखास्त करून पुन्हा सत्ता मिळवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या संजय राऊत यांच्यावर टीका करताना नवनाथ बन यांनी स्पष्ट केले की, मुंबईकरांनी ठाकरे गटाला पूर्णपणे नाकारले असून महायुतीला निवडून दिले आहे. त्यामुळे आता स्वप्नातही महापालिका बरखास्त करता येणार नाही. महायुती, भाजपा आणि शिवसेना मुंबईकरांच्या सेवेसाठी कटीबद्ध असून महापालिका ही स्वतःचे घर भरण्याचे साधन नाही, असे ते म्हणाले.
'महाराष्ट्र गीता'च्या अपमानावरून ठाकरेंवर निशाणा
लालबाग येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्यगीत (महाराष्ट्र गीत) सुरू असताना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकमेकांशी गप्पा मारण्यात व्यस्त असल्याचा गंभीर आरोप नवनाथ बन यांनी केला. "महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महाराष्ट्र गीताचा या दोघांनी अपमान केला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान शिकवला होता, परंतु आज त्यांचे वारसदार महाराष्ट्र गीताच्या वेळी सन्मानाने उभे राहू शकत नाहीत. यावरून त्यांचे मराठी आणि महाराष्ट्र प्रेम हे निव्वळ राजकीय आणि मतांपुरतेच बेगडी असल्याचे सिद्ध होते," अशी घणाघाती टीका बन यांनी शेवटी केली.
Labels: Maharashtra Politics, Navnath Ban, Devendra Fadnavis, Sanjay Raut, Rohit Pawar, Aditya Thackeray, BJP Maharashtra, MPSC News
Search Description: BJP spokesperson Navnath Ban sharp attack on Sanjay Raut and Rohit Pawar over farmer relief, ED recruitment, and Maharashtra Geet row.
Hashtags: #MaharashtraPolitics #BJP #SanjayRaut #RohitPawar #DevendraFadnavis #NavnathBan #MaharashtraGeet
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: