आंबेगाव पठार गोळीबार प्रकरणातील सराईत आरोपीला पकडले; पिस्तूल जप्त

 

पुणे: आंबेगाव पठार परिसरात पिस्तूल हाताळताना झालेल्या गोळीबारात एकास गंभीर जखमी करून फरार झालेल्या सराईत आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संकेत गोरक्ष चोरघे (वय ३०, रा. कोलवडी, ता. वेल्हे, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले १ पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे.

१ सप्टेंबर २०२६ रोजी आंबेगाव पठार येथील साईसिद्धी चौकात आरोपी संकेत चोरघे याने बेकायदेशीर पिस्तूल आणले होते. ही माहिती सनी उर्फ संदीप दीपक आणि अविनाश मोरे यांना असतानाही त्यांनी पोलिसांपासून लपवून ठेवली आणि ते पिस्तूल स्वतः हाताळले. त्यानंतर आरोपी संकेत याने निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे पिस्तूल हाताळल्याने त्यातून सुटलेली गोळी लागून त्याचा मित्र सनी उर्फ संदीप दीपक याच्या मांडीत घुसली आणि तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.

घटना घडल्यानंतर आरोपी संकेत चोरघे पिस्तूल घेऊन पसार झाला होता. वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक अविनाश पवार, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि सोहम शेंडकर शोध घेत होते. तपासादरम्यान आरोपी गदा चौका जवळील सर्व्हिस रोडवर थांबला असल्याची पक्की बातमी पोलिसांना मिळाली.

बातमी मिळताच पोलिसांनी गदा चौकातील सर्व्हिस रोडवर सापळा रचून आरोपी संकेत चोरघे याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत अग्निशस्त्र आणि काडतूस मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले

ही कारवाई पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड, निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, सहाय्यक निरीक्षक अविनाश पवार आणि सहकाऱ्यांनी केली.

  • Labels: Pune Crime News, Bharati Vidyapeeth Police, Illegal Firearm, Firing Case Pune, Pune Police

  • Search Description: Bharati Vidyapeeth Police arrested absconding criminal Sanket Chorghe and seized an illegal pistol used in an accidental firing incident at Ambegaon Pathar.

  • Hashtags: #PunePolice #CrimeNews #BharatiVidyapeeth #PistolSeized #PuneNews

आंबेगाव पठार गोळीबार प्रकरणातील सराईत आरोपीला पकडले; पिस्तूल जप्त आंबेगाव पठार गोळीबार प्रकरणातील सराईत आरोपीला पकडले; पिस्तूल जप्त Reviewed by ANN news network on ९/१५/२०२६ ०६:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".