गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद; तातडीच्या दुरुस्तीकामामुळे महापालिकेचा निर्णय


पुणे: पुणे शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये तातडीची विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी, १० सप्टेंबर २०२६ रोजी पुणे शहराचा काही भाग आणि संलग्न परिसराचा पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी  ही माहिती दिली आहे.

बुधवारी मध्यरात्री १२:०० वाजल्यापासून ते गुरुवारी मध्यरात्री १२:०० वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीसाठी ही सर्व जलकेंद्रे पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. तसेच दुरुस्तीच्या कामानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. यामुळे पुणेकरांनी आधीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत येणारा स्टेज २ पर्वती एचएलआर झोन, भामा आसखेड जॅकवेल, वारजे जलकेंद्र, एस. एन. डी. डी. जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, पाषाण व सुस गोल टाकी, चतुःश्रृंगी टाकी, जुने वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, कोंढवे-धावडे जलकेंद्र आणि वडगाव जलकेंद्र या सर्व प्रमुख ठिकाणांवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा प्रमुख परिसर:
पर्वती एचएलआर टाकी परिसर: सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर (काही भाग), महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, अप्पर व लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, सॅलेसबरी पार्क, ढोले मळा, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कोंढवा खुर्द, साईबाबानगर, जनता वसाहत इत्यादी.

भामा आसखेड जलकेंद्र परिसर: लोहगाव, कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी, आळंदी नगर परिषद व लगतचा भाग.

एस. एन. डी. डी. व कोथरूड परिसर: गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, लॉ कॉलेज रोड, बाणेर रोड, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड, मयूर कॉलनी, कर्वे रोड, नळस्टॉप, एरंडवणा, मंगेशकर रुग्णालय परिसर, नवसह्याद्री, म्हात्रे पुलाचा परिसर.

चांदणी चौक व बावधन परिसर: पाषाण साठवण टाकी, भुगाव रोड, बावधन परिसर, भुसारी कॉलनी, सुरजनगर, सागर कॉलनी, परमहंस नगर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस रोड.

गांधी भवन व वारजे परिसर: काकडे सिटी, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर गावठाण, कॅनॉल रोड.

बाणेर, बालेवाडी व चतुःश्रृंगी परिसर: बाणेर गावठाण, पॅनकार्ड क्लब रोड, विजयनगर, वीरभद्र नगर, सानेवाडी, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, औंध गाव परिसर.

लष्कर व बेकर हिल टाकी परिसर: लुल्लानगर, कौसरबाग, एनआयबीएम रोड, साळुंखे विहार, वानवडी, गंगा सॅटेलाईट, शिंदे छत्री परिसर, जगताप चौक.

वडगाव जलकेंद्र व कात्रज परिसर: दत्तनगर, संतोषनगर, आंबेगाव रस्ता, कात्रज गाव, सुखसागर नगर, कात्रज-कोंढवा रस्ता, येवलेवाडी, सिंहगड रस्ता परिसर, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार, सच्चाई माता टाकी व संपूर्ण येवलेवाडी.

इतर परिसर: मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे-धावडे परिसर.

गणेशोत्सवाचे दिवस सुरू असतानाच महापालिकेने तातडीचे हे काम काढल्याने नागरिकांची अडचण होण्याची शक्यता आहे. मात्र, भविष्यात पाणीपुरवठ्यात कोणताही तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी ही तातडीची दुरुस्ती आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंत्यांनी केले आहे.

  • Labels: Pune Water Cut, PMC News, Pune Water Supply, Parvati Water Works, Vadgaon Water Works, Pune Corporation, Maharashtra News

  • Search Description: Pune Municipal Corporation announces a full-day water shutdown in major parts of Pune city on Thursday, September 10, 2026, due to urgent repair works.

  • Hashtags: #PuneWaterCut #PMC #PuneNews #WaterSupplyShutdown #PuneCorporation #Maharashtra

गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद; तातडीच्या दुरुस्तीकामामुळे महापालिकेचा निर्णय गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद; तातडीच्या दुरुस्तीकामामुळे महापालिकेचा निर्णय Reviewed by ANN news network on ९/०७/२०२६ ०२:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".