विश्रांतवाडी, पुणे : विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद पार्क, भैरवनगर (धानोरी) येथून सानिका राजेश कदम (वय २०) ही तरुणी २७ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेली आहे. या प्रकरणी तिची आई वर्षा राजेश कदम (वय ४०) यांनी दिलेल्या माहितीवरून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर नंबर ११९/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.
प्रकरणाचा तपास सहायक फौजदार संदीप ठाकूर करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय घरातून निघून गेली असून तिच्याकडे मोबाईल फोन नाही.
बेपत्ता तरुणीचे वर्णन:
नाव: सानिका राजेश कदम (वय २० वर्षे), बांधा: मध्यम, रंग: गोरा, नाक: सरळ, केस: काळे मध्यम, चेहरा: गोल, उंची: ४ फूट ७ इंच. तिच्या अंगात निळ्या-जांभळ्या रंगाचा टी-शर्ट, फिकट जांभळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आणि पायात पांढऱ्या-तांबड्या रंगाची चप्पल आहे. ती मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा बोलते. तिच्या गळ्यात सोन्याची साखळी, कानात सोन्याचे टॉप्स असून जवळ सुमारे ५०० रुपये रोख रक्कम आहे.
या वर्णनाची तरुणी कोणास आढळून आल्यास अथवा तिची काही माहिती मिळाल्यास तातडीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Labels: Missing Person, Vishrantwadi Police, Dhanori Pune, Pune Police Alert, Crime News Pune
Search Description: A 20-year-old girl Sanika Rajesh Kadam reported missing from Dhanori, Pune. Vishrantwadi Police searching.
Hashtags: #MissingPerson #Dhanori #VishrantwadiPolice #PunePolice #PoliceAlert #PuneNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: