पुण्यात पद्मावती येथील खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला बेड्या; गुन्हे शाखा युनिट २ ची आंबील ओढ्या जवळ कारवाई!
पुणे: पुणे शहरात शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीस गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत, सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्मावती भागात घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेली तीन महिने लपून बसलेल्या एका सराईत आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाला यश आले आहे. १९ ऑगस्ट २०२६ रोजी ही धडक कारवाई करण्यात आली.
अनिकेत उत्तम जावीर (वय २३ वर्षे, रा. साने गुरुजीनगर, आंबील ओढ्याजवळ, सहकारनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पद्मावती येथील जय अंबे चौकात घडली होती घटना
प्राप्त माहितीनुसार, १९ मे २०२६ रोजी पद्मावती येथील जय आंबे चौक परिसरात जुन्या वादातून धारदार शस्त्राचा वापर करून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २०२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९०, ३५२ तसेच आर्म ॲक्ट कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१),(३)/१३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गुन्ह्यात सहभागी असलेला आरोपी अनिकेत जावीर हा गुन्हा घडल्यापासून पोलिसांना चकवा देत फरार झाला होता. पोलीस त्याचा सातत्याने शोध घेत होते, मात्र तो ठिकाणे बदलून लपून राहत होता.
आंबील ओढ्याजवळ सापळा
गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार महेश मंडलिक, कुंदन शिंदे आणि संदीप शिर्के यांना पद्मावती येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अनिकेत जावीर हा आंबील ओढ्याजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली. युनिट २ कडील पथकाने मिळालेल्या माहितीनुसार आंबील ओढ्या परिसरात सापळा रचला. संशयित वर्णनाचा तरूण तेथे दिसून येताच पथकाने त्याला चारी बाजूंनी घेरून ताब्यात घेतले. नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव अनिकेत उत्तम जावीर असे सांगितले.
पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात
ताब्यात घेतलेल्या अनिकेत जावीरकडे कसून चौकशी केली असता, त्याने पद्मावती येथील जय आंबे चौकात घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हवाली केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदरची यशस्वी कामगिरी अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपआयुक्त (आर्थिक व सायबर, अति. कार्यभार गुन्हे) विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक तेजश्री पवार, ज्ञानेश्वर दळवी, मलदार महेश मंडलिक, कुंदन शिंदे, संदीप शिर्के, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, सर्जेराव सरगर, संतोष टकले, नागनाथ राख, विजय पवार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, योगेश मांढरे, ओंकार कुंभार, शंकर कुंभार, आशिष यादव आणि विनायक वगारे यांनी सहभाग घेतला.
Labels:
Pune Crime News,Pune Police Crime Branch,Sahakarnagar Police Station,Attempt to Murder Arrest,Unit 2 Crime Branch,Tejaswi Satpute,Pune PoliceSearch Description:
Pune Police Crime Branch Unit 2 arrests absconding attempt to murder accused Aniket Javir from Ambil Odha area in Sahakarnagar Pune.Hashtags:
#PuneCrime #PunePolice #CrimeBranch #Sahakarnagar #AttemptToMurder #AniketJavir #MaharashtraNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: