पिंपरी-चिंचवडमधील २ गुन्ह्यांत फरार असलेला सराईत थेऊरमध्ये जेरबंद; पिस्तूल अन् काडतुसे जप्त


पुणे (विशेष प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये दीर्घकाळापासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-६ च्या पथकाने थेऊर येथून शिताफीने अटक केली. सुशील तानाजी गायकवाड (वय ३९, रा. दत्तनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १ गावठी बनावटीचे पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे, २ मोबाईल आणि दुचाकी असा एकूण १ लाख २५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट-६ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कदम, उपनिरीक्षक आशिष जाधव व कर्मचारी २८ ऑगस्ट रोजी हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान सहाय्यक निरीक्षक संतोष कदम यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, थेऊर येथील कांबळेवस्तीत म्हसोबा मंदिरामागील मोकळ्या जागेत काळ्या रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीवर एक संशयित इसम फिरत आहे. त्याच्याकडे गावठी पिस्तूल असून तो पिंपरी व दक्षिण म्हाळुंगे येथील गुन्ह्यांत फरार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात सापळा रचला.

संशयित इसमाला जागीच घेरून ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने सुशील गायकवाड असे नाव सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी त्याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा व मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष शेटे, सहाय्यक निरीक्षक संतोष कदम, उपनिरीक्षक आशिष जाधव, सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर शिर्के, अंमलदार तानाजी देशमुख, श्रीकांत पांडुळे, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, अमित सस्ते, नानासाहेब मोरे, प्रशांत कर्णवर, झाकीर पठाण, गणेश माने, अक्षय बांदल आणि महिला पथकाने केली आहे.


  • Labels: Crime Branch Unit 6 Pune, Absconding Criminal Arrested, Pistol Seized Theur, Loni Kalbhor Police, Pune Crime News

  • Search Description: Pune Crime Branch Unit 6 arrested a wanted criminal involved in Pimpri Chinchwad crimes with 1 pistol and 4 cartridges at Theur.

  • Hashtags: #PuneCrimeBranch #AbscondingCriminal #PistolSeized #TheurNews #PunePolice #CrimeUpdate

पिंपरी-चिंचवडमधील २ गुन्ह्यांत फरार असलेला सराईत थेऊरमध्ये जेरबंद; पिस्तूल अन् काडतुसे जप्त पिंपरी-चिंचवडमधील २ गुन्ह्यांत फरार असलेला सराईत थेऊरमध्ये जेरबंद; पिस्तूल अन् काडतुसे जप्त Reviewed by ANN news network on ८/२९/२०२६ ०६:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".