पुणे : दांडेकरपुलाजवळ दहशत माजवणारा सराईत अटकेत; पर्वती पोलिसांकडून १ देशी पिस्तूल अन् काडतूस जप्त


पुणे (विशेष प्रतिनिधी): परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला पर्वती पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत शिताफीने पकडले. अनिकेत बापू कसबे (वय २५, रा. राजीव गांधी नगर, नेर्लेकर हॉस्पिटलजवळ, दांडेकर पूल, पर्वती पायथा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तूल आणि १ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ ऑगस्ट रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी विशाल राऊत व कर्मचारी गस्त घालत होते. गस्ती दरम्यान पोलीस अंमलदार अमोल दबडे, अमित चिव्हे आणि रणजित घाटगे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दांडेकर पूल परिसरात एक तरुण बेकायदेशीर पिस्तूल घेऊन दहशत पसरवण्याच्या तयारीत आहे.

या माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक विशाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने सापळा रचून अनिकेत कसबे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पिस्तूल त्याने कुठून आणले आणि याचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला जाणार होता, याचा अधिक तपास पर्वती पोलीस करत आहेत.

ही कारवाई अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे, निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निरीक्षक विशाल राऊत, उपनिरीक्षक प्रकाश खिलारी, अंमलदार प्रकाश मरगजे, अमोल दबडे, अमित चिव्हे, रणजित घाटगे, स्वप्निल घुगे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सुर्या जाधव, गणेश तरंगे व मारुती तांदळे यांनी केली.


  • Labels: Parvati Police Station, Illegal Pistol Seized Pune, Crime News Pune, Dandekar Bridge Pune, Pune Police

  • Search Description: Parvati Police arrested Aniket Kasbe near Dandekar Bridge Pune and seized 1 country-made pistol and live cartridge.

  • Hashtags: #ParvatiPolice #PistolSeized #PuneCrime #LawAndOrder #DandekarBridge #PunePolice

पुणे : दांडेकरपुलाजवळ दहशत माजवणारा सराईत अटकेत; पर्वती पोलिसांकडून १ देशी पिस्तूल अन् काडतूस जप्त पुणे : दांडेकरपुलाजवळ दहशत माजवणारा सराईत अटकेत; पर्वती पोलिसांकडून १ देशी पिस्तूल अन् काडतूस जप्त Reviewed by ANN news network on ८/२९/२०२६ ०६:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".