शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६

मुंबईत ड्रोन, मायक्रो-लाईट एअरक्राफ्ट अन् पॅराग्लायडिंगवर ३० दिवसांची कडक बंदी: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क

Uploading: 587058 of 587058 bytes uploaded.
Uploading: 587058 of 587058 bytes uploaded.


मुंबई (६ ऑगस्ट २०२६): स्वातंत्र्यदिन आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि संभाव्य दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. मुंबईत ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो-लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हँड ग्लायडर्स आणि हॉट एअर बलून उडवण्यावर पुढील ३० दिवसांसाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

याबाबत बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ (पूर्वीचे CRPC १४४) अन्वये अधिकृत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
 
३० दिवसांचा कार्यकाळ अन् कडक निर्बंध
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा बंदीचा आदेश १३ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ वाजल्यापासून ते ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत (एकूण ३० दिवस) संपूर्ण बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लागू राहील.

या कालावधीत मुंबई पोलीस दलाकडून करण्यात येणारी हवाई निगराणी (Aerial Surveillance) किंवा पोलीस उपआयुक्त (अभियान) यांच्याकडून विशेष लेखी परवानगी मिळालेली उड्डाणे याला अपवाद राहतील. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही खासगी, व्यावसायिक किंवा मनोरंजनात्मक कारणासाठी हवेत उड्डाण करणाऱ्या वस्तू उडवण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
 
दहशतवादी हल्यांचा धोका आणि सुरक्षेचे कारण
आपल्या आदेशात पोलीस उपआयुक्त अकबर पठाण यांनी स्पष्ट केले आहे की, देशविरोधी किंवा दहशतवादी घटक ड्रोन, रिमोट संचलित लघू विमाने, पॅराग्लायडर्स यांसारख्या हवेत उडणाऱ्या वस्तूंचा वापर करून व्हीव्हीआयपी (VVIP) व्यक्तींना लक्ष्य करण्याची, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याची किंवा शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा प्रकारच्या संभाव्य घातपाती कारवाया रोखण्यासाठी आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक व सक्रिय उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे बनले होते, त्यामुळे हे कडक पाऊल उचलण्यात आले आहे.
 
नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाई
मुंबई पोलिसांच्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा बेकायदेशीरपणे ड्रोन/पॅराग्लायडर्स उडवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ (BNS Section 223) अन्वये कठोर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा  इशारा देण्यात आला आहे.


  • Labels: Mumbai Police, Drone Ban Mumbai, Akbar Pathan, Mumbai Security, Independence Day Security, BNSS Section 163, Crime News Mumbai, Maharashtra News

  • Search Description: Mumbai Police issue a 30-day ban on flying drones, microlight aircraft, and paragliders from August 13 to September 11, 2026, under BNSS Section 163 due to security threats.

Hash Tags

#MumbaiPolice #DroneBan #MumbaiNews #IndependenceDaySecurity #AkbarPathan #BNSS163 #SecurityAlert #BreakingNews #MaharashtraNews




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा