पुणे : हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 'सेव्हन स्पा'वर धाड टाकून पोलिसांनी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत २ पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून स्पा चालक आणि मॅनेजरविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २० ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, डी पी रोड, माळवाडी, हडपसर येथील 'सेव्हन स्पा'मध्ये स्पा चालक कपिल उर्फ काफिलउद्दीन हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मॅनेजर आसिफ याच्या माध्यमातून पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हडपसर पोलीस ठाण्याच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे २ पीडित महिला मिळून आल्या. आरोपी मसाज सेंटरच्या नावाखाली पैशांचे आमिष दाखवून महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत होते व त्यातून मिळालेल्या रकमेवर स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ५४१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १४३, ३ (५) सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ च्या कलम ३, ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ६) जीवन बेनिवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, हनुमंत गायकवाड यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, अंमलदार बापू लोणकर, पांडे, महिला अंमलदार पवार, गायकवाड व तपास पथकाने केली आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरात असा कोणताही बेकायदेशीर प्रकार किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Labels: Pune Police, Hadapsar News, Crime News Pune, Human Trafficking, Spa Raid Pune
Search Description: Pune City Police raided Seven Spa in Hadapsar and rescued two victimized women while booking the spa owner and manager.
Hashtags: #PunePolice #HadapsarNews #CrimeNews #HumanTrafficking #PuneCity
हडपसरमधील 'सेव्हन स्पा'वर छापा; सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश
Reviewed by ANN news network
on
८/२३/२०२६ ०२:५१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: