बाईक चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपींसह स्क्रॅपगोदाम मालक जाळ्यात, २४ बाईक्सचे सुटे भाग जप्त


मुंबई (विशेष बातमीदार): उत्तर प्रादेशिक विभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका भल्या मोठ्या टोळीचा दहिसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत ४ आरोपींना जेरबंद केले असून २४ मोटारसायकलींच्या नंबर प्लेट्स, चेसीज, इंजिन आणि इतर भाग हस्तगत केले आहेत. या धडक कारवाईमुळे दहिसर, एमएचबी, कस्तुरबा आणि मालवणी पोलीस ठाण्यांतील एकूण ०८ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोनीत भास्कर शेट्टी (वय २३, रा. दहिसर पूर्व), पंकज संगलप्रसाद गुप्ता (वय २०, रा. केतकीपाडा, दहिसर पूर्व), आशुतोष संतोष दुबे (वय २०, रा. धारखाडी रोड, दहिसर पूर्व) आणि गाड्या स्क्रॅप करणारा गोदाम मालक पिंटु छोटेलाल गुप्ता (वय २९, रा. केतकीपाडा, दहिसर पूर्व) यांचा समावेश आहे. याशिवाय एका १७ वर्षे ८ महिन्यांच्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
 
असा उघडकीस आला चोरीचा प्रकार

दहिसर पूर्व येथील अशोकवन, शिववल्लभ रोडवरून २० ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान एक हिरो होंडा सुपर स्प्लेंडर (MH 02 AZ 4549) चोरीला गेली होती. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १२४४/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिते व त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तीन जण एका बाईकवरून चोरीची बाईक धक्का मारून घेऊन जात असल्याचे दिसून आले. संशयितांच्या बाईकवर रेडियमने काढलेले एक विशिष्ट चित्र होते. या चित्राचा माग काढत असताना ती बाईक दहिसर पूर्व येथील साईबाबा मंदिर रोडवर पार्क केलेली सापडली. त्यानंतर आनंदनगर परिसरातून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
 
स्क्रॅप गोदामावर छापा आणि २५ पेक्षा जास्त गाड्यांचे अवशेष जप्त

आरोपींची चौकशी केली असता, ते रस्त्यावर किंवा सोसायटीबाहेर अनेक दिवस पार्क केलेल्या गाड्यांवर लक्ष ठेवून त्या चोरायचे. त्यानंतर या गाड्या केतकीपाडा येथील पिंटु गुप्ता याच्या स्क्रॅप गोदामात पाठवल्या जायच्या. पिंटु गुप्ता या गाड्यांचे सर्व भाग वेगळे करून भंगारात विकायचा. पोलिसांनी गोदामावर छापा मारून २४ मोटारसायकलींचे पार्टस, नंबर प्लेट्स, चेसीज आणि इंजिन जप्त केले.

या कामगिरीमुळे दहिसर पोलीस ठाण्याचे ४, एमएचबी पोलीस ठाण्याचे २, कस्तुरबा पोलीस ठाण्याचा १ आणि मालवणी पोलीस ठाण्याचा १ असे ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई अपर आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग) शशिकुमार मीना, उपआयुक्त (उत्तर परिमंडळ ०३) गजानन राजमाने, सहाय्यक आयुक्त जयराज रणवरे, वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील आणि निरीक्षक (गुन्हे) मारुती सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत गिते, हवालदार अमोल जाधव, अमित पाटील, शाहनवाज सय्यद, सागर पवार (तांत्रिक मदत), शिपाई सुशांत जाधव, कपिल चौधरी आणि महेंद्र महाले यांनी पार पाडली.


  • Labels: Dahisar Police Station, Bike Thieves Gang, Scrap Yard Raid, Crime Branch, Vehicle Theft Mumbai, Mumbai Police

  • Search Description: Dahisar Police bust a bike lifting gang, arresting 4 persons including a scrap dealer, and recovering parts of 24 motorcycles.

  • Hashtags: #DahisarPolice #BikeTheftRacket #MumbaiPolice #CrimeNews #MumbaiCrime #VehicleTheft

बाईक चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपींसह स्क्रॅपगोदाम मालक जाळ्यात, २४ बाईक्सचे सुटे भाग जप्त बाईक चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपींसह स्क्रॅपगोदाम मालक जाळ्यात, २४ बाईक्सचे सुटे भाग जप्त Reviewed by ANN news network on ८/३०/२०२६ ०१:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".