मुंबई : मुंबईतील दहिसर पूर्व परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला दहिसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास अटक केली आहे. संदीप रमाशंकर उपाध्याय (वय ३४, व्यवसाय- फॅब्रिकेशन, रा. रूम क्र. ०३, न्यू गणेशवाडी वेल्फेअर सोसायटी क्र. ०२, लक्ष्मण नगर, कुरार व्हिलेज, मालाड पूर्व, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून कारवाई
दहिसर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:३५ वाजता गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजीत पाटील यांना एकजण दहिसर चेक नाका परिसरात देशी पिस्तूल बाळगून वावरत असल्याची माहिती मिळाली. तदनंतर पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने दहिसर पूर्व येथील दक्षिण वाहिनीवरील महानगर गॅस पंपासमोर सापळा रचला. आणि तेथे वावरणाऱ्या संदीप उपाध्याय याला ताब्यात घेतले.
अंगझडतीत पिस्तूल आणि ६ काडतुसे हस्तगत
आरोपी संदीप उपाध्याय याची अंगझडती घेण्यात आली. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे आढळून आली.
हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि गुन्हा दाखल
आरोपीने मुंबई पोलीस आयुक्तांच्या हत्यार बंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सहाय्यक फौजदार ऑस्कर कोलासो यांनी सरकार पक्षातर्फे दिलेल्या तक्रारीवरून दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(अ), १३५ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
ही कारवाई उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त शशिकुमार मीना, उत्तर परिमंडळ १२ चे उपआयुक्त गजानन शिवलिंग राजमाने, दहिसर विभागाचे सहाय्यक आयुक्त जयराज रणवरे, दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील आणि निरीक्षक (गुन्हे) मारुती सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात सहाय्यक निरीक्षक इंद्रजीत पाटील, सहाय्यक फौजदार राजू नार्वेकर, हवालदार ऑस्कर कोलासो, चुंगीवडीयार, शिपाई विलास आव्हाड आणि निलेश शनवार यांचा समावेश होता.
Labels: Mumbai Police, Dahisar Police Station, Illegal Firearm Seized, Dahisar Check Naka, Mumbai Crime News
Search Description: Dahisar Police arrested a 34-year-old fabrication worker from Malad East for carrying an illegal country-made pistol and six live cartridges near Dahisar Check Naka.
Hashtags: #MumbaiPolice #DahisarPolice #CrimeNews #IllegalWeapons #MumbaiNews
दहिसर चेकनाका परिसरात पिस्तूल व ६ जिवंत काडतुसांसह फिरणाऱ्या मालाडच्या तरुणाला अटक
Reviewed by ANN news network
on
८/२४/२०२६ ०४:२३:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: