पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-४ च्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या प्रयत्नातील (भारतीय दंड विधान कलम ३०७) गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. महेश जनार्दन साठे (वय ३५ वर्षे, रा. घर नं. २९४, इंदिरा नगर, खडकी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला १३ ऑगस्ट २०२६ रोजी लोहगाव भागातील लेक व्ह्यू सिटी परिसरामधून शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी खडकी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचे हद्दीत सर्च ऑपरेशन आणि गस्त
पुणे शहरातील घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल चोरी, जबरी चोरी, मोक्का गुन्ह्यांतील पाहिजे असलेले आरोपी तसेच खून, खुनाचा प्रयत्न आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट-४ चे पथक १३ ऑगस्ट २०२६ रोजी खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त व पेट्रोलिंग करत होते.
पथक पाटील इस्टेट, शिवाजीनगर भागात आले असता पोलीस अंमलदार जहांगीर पठाण आणि अनिकेत भोसले यांना खडकी पोलीस ठाण्यातील एका गंभीर गुन्ह्यात गेल्या सुमारे ३ वर्षांपासून फरार असलेला आरोपी महेश जनार्दन साठे हा लोहगाव येथील वडगाव शिंदे रस्त्यावरील लेक व्ह्यू सिटी, गल्ली नंबर ७ मधील पुजारी निवास समोर थांबला असल्याची माहिती मिळाली/
सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात
मिळालेल्या बातमीची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना आणि मार्गदर्शन केले. युनिट-४ च्या पथकाने लोहगाव येथील गल्ली नंबर ७ मध्ये आरोपीला. चारही बाजूंनी वेढा घालून ताब्यात घेतले.
त्याच्याकडे नाव व पत्त्याबाबत विचारपूस केली असता त्याने आपले नाव महेश जनार्दन साठे (वय ३५ वर्षे, रा. इंदिरा नगर, खडकी, पुणे) असे सांगितले.
जुन्या भांडणातून मारहाण; ३ वर्षांपासून होता पसार
आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने ऑगस्ट २०२३ मध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून आपल्या साथीदारांच्या सोबतीने एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची कबुली दिली. या घटनेप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गु. र. नं. २९२/२०२३ भा. दं. वि. कलम ३०७, ३२३, ३४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना चकवा देऊन पसार झाला होता. तपासात निष्पन्न झालेल्या या माहितीच्या आधारे युनिट-४ च्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी खडकी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही कामगिरी अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत युनिट-४ च्या वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव यांच्या सूचनेनुसार पनिरीक्षक वैभव मगदूम, दिग्विजय चौगुले, अंमलदार जहांगीर पठाण, अनिकेत भोसले, अमजदखान शेख, विशाल इथापे, वैभव रणपिसे, शंतनू डोंगरे, रोहिणी पांढरकर आणि मयुरी नलावडे यांनी प्रत्यक्ष भाग घेतला.
Labels: Pune Crime Branch, Unit 4 Pune, Attempt To Murder Arrest, Khadki Police Station, Absconding Accused Arrested, Pune Police Action
Search Description: Pune Crime Branch Unit-4 arrested Mahesh Janardan Sathe, who was absconding for nearly 3 years in an attempt to murder case at Khadki Police Station
. Hashtags: #PunePolice #CrimeBranch #Khadki #PuneCrimeNews #AbscondingArrested #LawAndOrder #CrimeNews
खडकीतील खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला ३ वर्षांनंतर बेड्या: लोहगावमधून अटक
Reviewed by ANN news network
on
८/१७/२०२६ ०६:३९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: