पुणे (विशेष प्रतिनिधी): शहर परिसरातील बेकायदेशीर अग्निशस्त्रांची विक्री आणि बाळगण्यावर निर्बंध घालण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी धडक मोहीम राबवून दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ३ गावठी बनावटीचे कट्टे (पिस्तूल) आणि ४ जिवंत काडतुसे असा साठा जप्त केला आहे.
पहिली कारवाई २६ ऑगस्ट रोजी गस्ती दरम्यान करण्यात आली. उपनिरीक्षक रवि जाधव व अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी हे साई सिद्धी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ दरम्यान गस्त घालत असताना, श्री कोचिंग क्लासेससमोरील गल्लीत ओंकार उर्फ बब्या संतोष पवार (वय १८, रा. आंबेगाव पठार) हा संशयितरीत्या थांबलेला आढळला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे १ गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी कारवाई २७ ऑगस्ट रोजी करण्यात आली. उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कात्रज डेअरी चौक ते सरहद्द चौकादरम्यान डेअरीच्या भिंतीजवळ एक इसम अग्निशस्त्रासह थांबला आहे. पोलिसांनी तत्काळ धाड टाकून शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६, रा. आंबेगाव पठार, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ गावठी बनावटीचे कट्टे व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस तपासात दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई उपायुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड, निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवि जाधव, अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे व पथकाने पार पाडली.
Labels: Bharati Vidyapeeth Police Station, Illegal Weapons Seized, Pistols Arrest Pune, Crime News Pune, Pune Police
Search Description: Bharati Vidyapeeth Police arrested two record criminals and seized 3 country-made pistols and 4 live cartridges in Pune.
Hashtags: #BharatiVidyapeethPolice #PistolsSeized #PuneCrime #IllegalWeapons #PunePolice #LawEnforcement
भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई; तीन गावठी पिस्तूले जप्त; दोन सराईतांना अटक
Reviewed by ANN news network
on
८/२९/२०२६ ०६:१८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: