रविवार, ३० ऑगस्ट, २०२६

अमलीपदार्थ विरोधीकक्षाचा दणका: ६.१२ लाखांचे २०४ LSD डॉट्स पेपर जप्त, दोघे जेरबंद




मुंबई (विशेष बातमीदार): मुंबईत बेकायदेशीरपणे अमली पदार्थांचा साठा बाळगून त्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) मोठी कारवाई केली आहे. परेल येथील भोईवाडा भागात गस्तीवर असलेल्या बांद्रा युनिटच्या पोलीस पथकाने २८ ऑगस्ट २०२६ रोजी कारवाई करत ६ लाख १२ हजार रुपये किमतीचे २०४ एलएसडी (LSD) डॉट्स पेपर बाळगणाऱ्या दोन आरोपींना रंगेहात ताब्यात घेऊन अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नितेश अनिल कांबळे (वय ३४, रा. भोईवाडा, मुंबई) आणि शुभम जनार्धन लोखंडे (वय २९, रा. पनवेल, नवी मुंबई) यांचा समावेश आहे.
 
गस्तीदरम्यान खान वजीर चाळीसमोर रंगेहात पकडले

अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे बांद्रा युनिट २८ ऑगस्ट रोजी जी.डी. आंबेकर मार्ग, परेल, भोईवाडा परिसरातील खान वजीर चाळ आणि महावीर ज्वेलर्सच्या आसपास गस्त घालत होते. या सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या नितेश कांबळे आणि शुभम लोखंडे यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे अत्यंत घातक मानला जाणारा एलएसडी डॉट्स पेपर हा अमली पदार्थ आढळून आला.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण ३.९१ ग्रॅम वजनाचे २०४ एलएसडी डॉट्स पेपर जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत ६ लाख १२ हजार रुपये आहे.
 
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही धडक कारवाई आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, उपआयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) पौर्णिमा चौगुले (श्रींगी) आणि सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

बांद्रा युनिटचे प्रभारी निरीक्षक विशाल चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या दोन तस्करांचा पर्दाफाश केला असून, हे ड्रग्ज कुठून आणले गेले आणि कोणाला पुरवले जाणार होते, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

  • Labels: ANC Mumbai, Crime Branch Mumbai, LSD Dots Seized, Parel Bhoiwada, Drug Bust Mumbai, Mumbai Police

  • Search Description: Anti Narcotics Cell Bandra Unit arrests two persons with 204 LSD dots paper worth Rs 6.12 lakh in Parel, Mumbai.

  • Hashtags: #ANCMumbai #DrugBust #LSD #MumbaiCrime #Parel #Bhoiwada #MumbaiPolice

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा