बीएचएमएस सीसीएमपी डॉक्टरांची नोंदणी न केल्यास आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन; पुण्यातील पत्रकार परिषदेत इशारा
पुणे : बी.एच.एम.एस.पदवी नंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये मॉडर्न फॉर्मोकोलॉजी सर्टिफिकेट कोर्स केलेल्या बी.एच.एम.एस. ( BHMS) डॉक्टरांची रखडलेली नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये सुरू करण्यात यावी,अन्यथा ८ दिवसात आझाद मैदान येथे अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टरांनी आणि त्यांच्या संघटना प्रतिनिधींनी दिला. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुद्दाम या नोंदणीला विरोध असल्याने ही नोंदणी रखडली असून २०१४ पासून अंदाजे १० हजार डॉक्टरांचे भवितव्य धोक्यात आले आहे,असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी अडीच वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ.चंदन लोखंडे (होमिओपॅथिक फेडरेशन पुणे समन्वयक),डॉ सुनील जगताप (डॉक्टर सेल अध्यक्ष राष्ट्रवादी पक्ष),डॉ राहुल काळभोर (होमिओपॅथिक फेडरेशन समन्वयक),डॉ.बाळकृष्ण गायकवाड (सी.सी.एम.पी रजिस्टर्ड होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन प्रदेशाध्यक्ष),संदीप बुटाला (डॉक्टर सेल प्रमुख,भारतीय जनता पक्ष),डॉ.अजय तायडे (मनसे) हे उपस्थित होते.
आदिवासी दुर्गम भागात तसेच खेड्यापाड्यात गावोगावी, शहरी गरीब भागांत सुद्धा वैद्यकीय सेवा देणारे 90 टक्के डॉक्टर BHMS पदवीधर आहेत .आरोग्य यंत्रणेवरचा ताण BHMS डॉक्टरांच्या सेवेमुळे ताण कमी होतो . BHMS डॉक्टरांचा syllabus सुद्धा जवळ जवळ MBBS सारखाच आहे .या सर्व गोष्टींचा पुनर्विचार करून महाराष्ट्र शासनाने BHMS डॉक्टरांचा दर्जा वाढविण्यासाठी 2014 साली कायदे तज्ञ, मेडिकल एक्सपर्ट, वैद्यकीय प्रशासक या सर्वांची एक समिती गठित करून चर्चा करून अभ्यास करून "सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी" (CCMP) हा एक वर्षाचा कोर्स तयार करून दोन्ही मंत्री मंडळांच्या मान्यतेनंतर हा कोर्स कायद्याच्या मसुद्यात कायदेशीर बसविण्यात आला .हा कोर्स केलेल्या BHMS डॉक्टरांची नोंदणी MMC (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल)मध्ये करण्यात येईल असा ठराव झाला . त्या संदर्भात जीआर काढून या ठरावावर शिक्का मोर्तब झाले. त्यानंतर एका "इंडियन मेडिकल असोसिएशन"(IMA) या खाजगी संघटनेने या कोर्सच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली . त्या याचिकेत मागण्या केल्या की कोर्स रद्द करावा, त्या कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती द्यावी. उच्च न्यायालयाने दोन्हीही बाजू ऐकून तपासून आदेश दिला की कोर्स ला कोणत्याही प्रकारचा स्टे लावण्यात आलेला नाही. BHMS च्या हजारो डॉक्टरांनी लाखो रुपये खर्च करून हा कोर्स एम.यु.एच. एस . (MUHS) मध्ये शिकले . न्यायालयीन निर्णयाच्या भरवशावर अजूनही हजारो विद्यार्थी शिकत आहेत. परीक्षा देतात, पैसे भरतात .तरीही त्यांचे भवितव्य नोंदणीअभावी धोक्यात आले आहे.
आयएमए चा कोलदांडा !
न्यायव्यवस्थेच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या IMA वर सरकारने कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे आणि MMC मध्ये BHMS(साडे चार वर्षे कोर्स + एक वर्ष इंटर्नशीप) + CCMP (एक वर्षे कोर्स ) अशाप्रकारे एकूण साडे सहा वर्षे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. नोंदणी न झाल्यास आझाद मैदानावर हजारो डॉक्टर्स अन्न त्याग आंदोलन करणार आहेत.
Labels: BHMS CCMP Doctors, Maharashtra Medical Council, IMA Controversy, Pune News, Doctors Agitation, Azad Maidan Protest, Health News Maharashtra, MUHS
Search Description: BHMS doctors who completed the CCMP course threaten hunger strike at Azad Maidan within 8 days if Maharashtra Medical Council delays their registration.
Hash Tags
#BHMSDoctors #CCMPCourse #MMC #MaharashtraHealth #AzadMaidanProtest #PuneNews #DoctorsStrike #BreakingNews
बीएचएमएस सीसीएमपी डॉक्टरांची नोंदणी न केल्यास आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन; पुण्यातील पत्रकार परिषदेत इशारा
Reviewed by ANN news network
on
८/०४/२०२६ ०५:५७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: