साकीनाका वाहतूक विभागाच्या हद्दीतील साकीनाका जंक्शन ते दिशा हॉस्पिटल, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड या मार्गावर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गाळे (गोडाऊन), दोन महत्त्वाचे मेट्रो स्टेशन, पेट्रोल पंप, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीची दुकाने, व्यावसायिक इमारती, मशिदी तसेच महानगरपालिकेच्या शाळा आहेत.
या परिसरातील गोडाऊनमध्ये माल खाली करण्यासाठी किंवा लोड करण्यासाठी येणारी छोटी-मोठी आणि अवजड वाहने, तसेच इतर खाजगी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुतर्फा पार्क केली जातात. विशेषतः पीक अवरमध्ये (कमाल गर्दीच्या वेळी) होणाऱ्या या बेशिस्त पार्किंगमुळे येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चालण्यासाठी जागा उरत नाही. यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच, या भागात लागणाऱ्या रांगांमुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अतिमहत्त्वाच्या सेवा पुरवणारी वाहने अडकून पडत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ही गंभीर गैरसोय दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस उप आयुक्त (पूर्व उपनगरे), वाहतूक, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नो-पार्किंगचा आदेश तात्पुरत्या स्वरूपात पुढील तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. हा आदेश दिनांक ४ जुलै २०२६ पासून लागू झाला असून तो दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत चोवीस तास लागू न राहता केवळ कमाल गर्दीच्या (पिक अवर) वेळेतच प्रभावी राहील.
नो-पार्किंगची दैनंदिन वेळ पुढीलप्रमाणे आहे.
सकाळची वेळ: सकाळी ०७:०० ते ११:०० वाजेच्या दरम्यान.
संध्याकाळची वेळ: सायंकाळी १७:०० ते २१:०० वाजेच्या दरम्यान.
या निश्चित केलेल्या वेळेत साकीनाका जंक्शन ते दिशा हॉस्पिटल दरम्यान उत्तर व दक्षिण वाहिनीवर कोणतेही वाहन उभे करण्यास सक्त मनाई असेल.

जनतेस पोहोचणारा धोका, अडथळा तसेच गैरसोय टाळण्यासाठी पोलीस उप आयुक्त, पूर्व उपनगरे, वाहतूक प्रदिप चव्हाण यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ११५ (१९८८ चा नियम ५९) आणि शासकीय अधिसूचना क्रमांक एमव्हीए ०५८९/सीआर-१०६१/टिआरए-२, दिनांक १९/०५/१९९० मधील तरतुदींनुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी स्थानिक वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यामार्फत केली जाणार आहे. पीक अवरच्या वेळेत नियमांचे उल्लंघन करून वाहने उभी करणाऱ्यांवर क्रेनद्वारे वाहन उचलण्याची आणि दंडात्मक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Labels :
Mumbai Traffic Updates,Sakinaka No Parking,Andheri Ghatkopar Link Road,Mumbai Police Notification,Traffic EnforcementSearch Description: Mumbai Traffic Police has declared a temporary No-Parking zone from Sakinaka Junction to Disha Hospital on Andheri-Ghatkopar Link Road during peak hours (7 AM-11 AM & 5 PM-9 PM) from 4th July to 3rd October 2026.
Hashtags: #MumbaiTraffic #SakinakaNews #NoParkingZone #MumbaiPolice #TrafficAlert
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा