पुण्यात नियमित पाणीपुरवठा कायम; सध्या पाणीकपात लागू नाही, महापौर मंजूषा नागपुरे यांची स्पष्टोक्ती


पुणे, दिनांक २४ जुलै : पुणे शहरात सध्या नियमित पाणीपुरवठा सुरू असून, कोणत्याही प्रकारची पाणीकपात लागू करण्यात आलेली नसल्याची माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली आहे.

महापौर नागपुरे यांनी सांगितलं की, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि २२ जुलैनंतरच्या पावसाच्या स्थितीचा आढावा घेऊन पाणीकपात पुन्हा सुरू करायची की नाही, याबाबत निर्णय अपेक्षित होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरासह धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानं सध्या नियमित पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत धरणांमध्ये सुमारे दोन टीएमसी पाण्याची भर पडली असून, एकूण उपयुक्त पाणीसाठा २० पूर्णांक ५० टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.

धरणांमधील वाढत्या पाणीसाठ्यामुळे पुणे शहराच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्याबाबतची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून टप्प्याटप्प्यानं पाणी सोडण्याचं नियोजन जलसंपदा विभागानं केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.


  • Labels: Pune Water Supply, Manjusha Nagpure, Pune News, Water Cut Updates, Maharashtra News

  • Search Description: Pune Mayor Manjusha Nagpure confirms that regular water supply will continue in Pune and no water cuts are currently implemented due to good rainfall in dam areas.

  • Hash Tags: #PuneWaterSupply #ManjushaNagpure #PuneNews #WaterUpdate #MaharashtraNews #RainfallUpdate

पुण्यात नियमित पाणीपुरवठा कायम; सध्या पाणीकपात लागू नाही, महापौर मंजूषा नागपुरे यांची स्पष्टोक्ती पुण्यात नियमित पाणीपुरवठा कायम; सध्या पाणीकपात लागू नाही, महापौर मंजूषा नागपुरे यांची स्पष्टोक्ती Reviewed by ANN news network on ७/२४/२०२६ ११:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".