शनिवार, ४ जुलै, २०२६

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; खडकीतील 'खुनाचा प्रयत्न' प्रकरणातील फरार आरोपी रोहन हिंगणेश्वर अटक


पुणे: पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट २ ने एक अत्यंत महत्त्वाची कारवाई करत खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) सारख्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला शिताफीने अटक केली आहे. २ जुलै २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने कोंढवा येथील येवलेवाडी परिसरात सापळा रचून या आरोपीला जेरबंद केले.

पानसरे नगर परिसरात रचला सापळा: 

गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, नागनाथ राख आणि शंकर नेवसे हे युनिट २ च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त व पेट्रोलिंग करत होते. यावेळी नमुद पथकाला बातमीदाराकडून एक खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने पानसरे नगर, येवलेवाडी, कोंढवा, पुणे येथे कारवाई करत रोहन ऊर्फ राहुल महेश हिंगणेश्वर (वय २२ वर्ष, रा. बोपोडी, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेतले.

गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी: 

अटक करण्यात आलेला आरोपी रोहन हिंगणेश्वर हा खडकी पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजि. क्रमांक १४३/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम १०९, १९०, १९१, १९१/३, ११८/२, १२५, ३५१/२, ३५२, आर्म ॲक्ट ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५) मधील खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे होता. या आरोपीवर यापूर्वीही खडकी पोलीस ठाण्यात शरिराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटक केल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी खडकी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.

सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहा. आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे,  अंमलदार उज्वल मोकाशी, नागनाथ राख, शंकर नेवसे, शिवानंद कायगुडे, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, योगेश मांढरे, संदीप शिर्के, आजीम शेख, विशाल दळवी, सद्दाम तांबोळी आणि ऋषिकेश व्यवहारे यांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने केली आहे.


  • Labels: Pune Police Crime Branch, Rohan Hinganeshwar Arrest Bopodi, Attempt To Murder Case Pune, Khadki Police Station Accused, Tejaswi Satpute IPS, Pune Crime Update 2026

  • Search Description: Pune Police Crime Branch Unit 2 has arrested record criminal Rohan alias Rahul Mahesh Hinganeshwar from Yeolewadi in an attempt to murder case.

  • Hashtags: #PunePolice #CrimeBranch #Khadki #BopodiNews #Arrested #CrimeUpdate #TejaswiSatpute #PuneCrime #BreakingNewsPune


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा