क्षेत्रनिहाय वाहतूक बदलांचे नियोजन
जेजुरी पोलीस स्टेशन आणि बेलसर फाटा: १० जुलै रात्री ८ वाजल्यापासून १३ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत बारामती, फलटण आणि साताराकडून येणारी वाहतूक बेलसर फाटा-वाघापूर चौक-उरुळी कांचन मार्गे वळवण्यात आली आहे. १३ जुलै सायंकाळी ५ ते १४ जुलै रात्री १० वाजेपर्यंत जेजुरी, सातारा, फलटण, लोणंद आणि बारामतीकडे जाणारी सर्व वाहतूक बेलसर-नाझरे-काळा ओढा-मोरगाव-निरा-लोणंद या मार्गाने वळवण्यात आली आहे.
मोरगाव चौक, जेजुरी: १० जुलै रात्री ८ ते १२ जुलै रात्री १० वाजेपर्यंत पालखीची वाहतूक वगळता इतर सर्व वाहने जेजुरी-मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे पुणेकडे वळवण्यात आली आहेत. तसेच, १४ जुलै दुपारी १ ते १५ जुलै रात्री १० वाजेपर्यंत पुणे-सासवड मार्गे लोणंद-सातारा-फलटणकडे जाणारी वाहतूक जेजुरी-मोरगाव-लोणी भापकर फाटा-कोऱ्हाळे मार्गे फलटणकडे वळवण्यात आली आहे.
भोरवाडी फाटा, जेजुरी: १४ जुलै दुपारी १ ते १५ जुलै रात्री १० वाजेपर्यंत कोळविहीरे-मोरगाव रोड-मोरगाव-लोणी भापकर फाटा-कोऱ्हाळे मार्गे फलटणकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.
निरा, श्री छत्रपती शिवाजी चौक: १० जुलै रात्री ८ ते १५ जुलै रात्री ११ वाजेपर्यंत सातारा, फलटण, लोणंद येथून पुण्याकडे जाणारी सर्व वाहतूक निरा-मोरगाव-सुपा-केडगाव चौफुलामार्गे वळवण्यात आली आहे.
बेलसर गाव, कोथळे चौक: १० जुलै रात्री ८ ते १३ जुलै सकाळी ५ वाजेपर्यंत कोथळे चौक ते सासवड दरम्यान वाहतूक बंद असेल. १३ जुलै सकाळी ५ ते १४ जुलै रात्री ११ वाजेपर्यंत जेजुरी मार्गे जाणारी सर्व वाहतूक बेलसर-कोथळे चौक-कोथळेगाव-नाझरे-काळा ओढा-मोरगाव किंवा नाझरे-पांडेश्वर-सुपा-मोरगाव मार्गे वळवण्यात आली आहे.
पारगाव मेमाणे चौक, जेजुरी: १२ जुलै सकाळी ५ ते १४ जुलै रात्री ११ वाजेपर्यंत बेलसर-कोथळे चौक-कोथळेगाव-नाझरे-काळा ओढा-मोरगाव किंवा नाझरे-पांडेश्वर-सुपा-मोरगाव मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
सुपा पोलीस स्टेशन, मोरगाव: १३ जुलै सकाळी ५ ते १५ जुलै रात्री ११ वाजेपर्यंत निराकडून जेजुरीमार्गे पुण्याकडे जाणारी वाहतूक मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला-सोलापूर महामार्गे वळवण्यात आली आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन: १४ जुलै सकाळी ५ ते १५ जुलै रात्री ११ वाजेपर्यंत निंबुत-मुरुम-काळज मार्ग लोणंद अशी वाहतूक वळवण्यात आली आहे.
सासवड पोलीस स्टेशन: १३ जुलै सकाळी ५ ते १५ जुलै रात्री ११ वाजेपर्यंत पुण्यातून जेजुरीमार्गे सातारा, फलटणकडे जाणारी वाहतूक सासवड-नारायणपूर-कापूरहोळ किंवा सासवड-वीर फाटा-परिंचे-वीर-वाठार कॉलनी मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच, १३ जुलै सकाळी ५ ते १४ जुलै रात्री ११ वाजेपर्यंत बारामतीकडे जाणारी वाहतूक सासवड-पारगाव मेमाणे-पिसर्वे-सुपा मार्गे वळवण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि वारी कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Labels: Palkhi Sohala 2026, Traffic Diversion, Pune Rural Police, Wari 2026, Maharashtra Traffic Update
Search Description: Traffic diversions on Pune-Pandharpur highway due to Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2026. District Collector Jitendra Dudi has issued official notification for alternative routes.
Hashtags: #PalkhiSohala2026 #PuneTraffic #Wari2026 #TrafficDiversion #MaharashtraNews #JitendraDudi #PuneRural
वारीनिमित्त पुणे-पंढरपूर महामार्गावर वाहतूक निर्बंध; जिल्हा प्रशासनाकडून पर्यायी मार्ग जाहीर
Reviewed by ANN news network
on
७/१०/२०२६ ०६:२८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: