रोहित भारत गायकवाड (वय २५, रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य फरार आरोपीचे नाव आहे. रोहितवर वानवडी पोलीस ठाण्यात २०२५ मध्ये भारतीय न्याय संहिता, आर्म्स ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) सन १९९९ च्या विविध कडक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना चकवा देऊन फरार होता.
गुन्हे शाखा युनिट-५ चे पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, रोहित गायकवाड हा बारामतीमधील वाघळवाडी येथील अट्टल गुन्हेगार ऋतिक उर्फ काल्या रणजित रावळकर (वय २६) याच्या घरी लपून राहिला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने वाघळवाडी येथील 'कन्डवस्ती' परिसरातील घरावर छापा टाकला आणि रोहित गायकवाड याला ताब्यात घेतले. गंभीर गुन्हेगाराला राजाश्रय दिल्याबद्दल ऋतिक उर्फ काल्या यालाही अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते आणि उपायुक्त गौहर हसन यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
Labels: Pune Crime Branch, MCOCA Arrest, Wanawadi Police, Baramati Raid, Absconding Criminal Caught
Search Description: Pune Crime Branch Unit 5 arrested an absconding MCOCA accused Rohit Gaikwad from Baramati along with his accomplice who provided him shelter.
Hashtags: #PuneCrime #MCOCA #PunePolice #CrimeBranch #BaramatiNews #LawEnforcement
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा