पुणे: पुणे शहर पोलीस अभिलेखानावरील गंभीर स्वरूपाच्या 'मोक्का' (MCOCA) गुन्ह्यात गेल्या एका वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने बारामती तालुक्यातून शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत, आरोपी गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे माहीत असूनही त्याला स्वतःच्या घरात आश्रय देणाऱ्या त्याच्या एका साथीदारालाही पोलिसांनी जेरबंद केले आहे. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
रोहित भारत गायकवाड (वय २५, रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य फरार आरोपीचे नाव आहे. रोहितवर वानवडी पोलीस ठाण्यात २०२५ मध्ये भारतीय न्याय संहिता, आर्म्स ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) सन १९९९ च्या विविध कडक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना चकवा देऊन फरार होता.
गुन्हे शाखा युनिट-५ चे पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, रोहित गायकवाड हा बारामतीमधील वाघळवाडी येथील अट्टल गुन्हेगार ऋतिक उर्फ काल्या रणजित रावळकर (वय २६) याच्या घरी लपून राहिला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने वाघळवाडी येथील 'कन्डवस्ती' परिसरातील घरावर छापा टाकला आणि रोहित गायकवाड याला ताब्यात घेतले. गंभीर गुन्हेगाराला राजाश्रय दिल्याबद्दल ऋतिक उर्फ काल्या यालाही अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते आणि उपायुक्त गौहर हसन यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

Labels: Pune Crime Branch, MCOCA Arrest, Wanawadi Police, Baramati Raid, Absconding Criminal Caught
Search Description: Pune Crime Branch Unit 5 arrested an absconding MCOCA accused Rohit Gaikwad from Baramati along with his accomplice who provided him shelter.
Hashtags: #PuneCrime #MCOCA #PunePolice #CrimeBranch #BaramatiNews #LawEnforcement
वानवडी पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार रोहित गायकवाड जेरबंद; आसरा देणाऱ्या साथीदारालाही बेड्या
Reviewed by ANN news network
on
७/०२/२०२६ ०४:१०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: