"संजय राऊत तुम्ही जनरल लायर आहात आणि तुमचा पक्ष जनरल डायपर!": भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात


मुंबई | ३० जुलै २०२६ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाने अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. "संजय राऊत, तुम्ही 'जनरल लायर' आहात आणि तुमचा पक्ष हा 'जनरल डायपर'सारखा झाला आहे. पक्षात सुरू असलेली गळती तुम्हाला थांबवता येत नाही आणि तुम्ही अमित शाह यांच्यावर टीका करता?" असा थेट आणि घणाघाती हल्ला भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्या आरोपांचा समाचार घेत त्यांची खरडपट्टी काढली.

दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलनावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयावर केलेल्या आरोपांना नवनाथ बन यांनी पूर्णपणे फेटाळून लावले. संसदेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, कुठेही विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवण्यात आलेल्या नाहीत. तरीही संजय राऊत सातत्याने खोटे बोलून देशाची दिशाभूल करत आहेत आणि अफवा पसरवत आहेत, असा आरोप बन यांनी केला. दिल्लीतील आंदोलनात बलात्कारासह इतर विविध गुन्हे दाखल असलेले काही गुन्हेगार विद्यार्थ्यांच्या आड लपून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होते. देशात बांगलादेश आणि नेपाळसारखी अराजकाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न या समाजकंटकांकडून सुरू होता. अशा समाजकंटकांचे संजय राऊत समर्थन का करत आहेत, याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दिले पाहिजे, असे आवाहन नवनाथ बन यांनी केले.

गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाचे समर्थन करताना नवनाथ बन म्हणाले की, "पुलवामा किंवा पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा कोणी केला? गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला कलम ३७० हटवता आले नाही, ते अमित शाह यांनी हटवून दाखवले. दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात ते कंबर कसून लढत आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला, म्हणूनच संजय राऊतांचा पोटशूळ उठला आहे. अमित शाह यांचे नेतृत्व देशाने स्वीकारले असून जम्मू-काश्मीरमधील दगडफेक थांबली आहे. मात्र राऊतांची पोटदुखी थांबायला तयार नाही. आधी स्वतःचा पक्ष सांभाळा आणि मगच गृहमंत्र्यांवर टीका करा."

पुण्यात १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावरून राऊतांनी केलेल्या वक्तव्याचाही बन यांनी समाचार घेतला. पुण्यात लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार अमित शाह यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना दिला जात आहे. याचा संपूर्ण देशवासीयांना अभिमान आहे. लोकमान्य टिळाकांनी ज्या देशभक्तीच्या वृत्तीने इंग्रजांशी लढा दिला, त्याच आदर्शाने अमित शाह हे पाकिस्तान आणि बांगलादेशला धडा शिकवत आहेत. इतरांना दूषणे देण्यापलीकडे काहीही न जमणाऱ्या संजय राऊत यांना 'पुण्यभूषण' नव्हे तर 'पुण्यदूषण पुरस्कार' दिला पाहिजे, अशी खोचक टीका त्यांनी केली.

आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केलेल्या महिला सन्मानाच्या आरोपांवर उत्तर देताना नवनाथ बन यांनी रोहित पवारांच्या भूतकाळातील भूमिकेची आठवण करून दिली. अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवारांबद्दल एक पोस्ट लिहिली म्हणून तिला तुरुंगात डांबणारे रोहित पवार हेच होते. स्वतःच्या काकींबद्दल अपशब्द वापरणारे आणि सातत्याने महिलांचा अपमान करणारे रोहित पवार महाराष्ट्राला चांगलेच ठाऊक आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपला महिला सन्मानाची भाषा शिकवू नये, असे सांगत त्यांनी रोहित पवारांना फैलावर घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा दाखला देत नवनाथ बन म्हणाले की, आज देशातील तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ठामपणे उभी आहे. सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदींशी संवाद साधणाऱ्यांचा प्रतिसाद सर्वाधिक आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही खोटा प्रचार केला, तरी देश आणि महाराष्ट्रातील जनता विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाजूनेच उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


  • Labels: Navnath Ban, Sanjay Raut, BJP vs Shiv Sena UBT, Amit Shah Pune Visit, Rohit Pawar, Maharashtra Politics, Jantar Mantar Protest

  • Search Description: BJP spokesperson Navnath Ban launches a scathing attack on Shiv Sena UBT MP Sanjay Raut and NCP leader Rohit Pawar over their statements on Amit Shah and Jantar Mantar.

  • Hashtags: #NavnathBan #SanjayRaut #BJPvsUBT #MaharashtraPolitics #AmitShah #RohitPawar #MumbaiNews


"संजय राऊत तुम्ही जनरल लायर आहात आणि तुमचा पक्ष जनरल डायपर!": भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात "संजय राऊत तुम्ही जनरल लायर आहात आणि तुमचा पक्ष जनरल डायपर!": भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात Reviewed by ANN news network on ७/३०/२०२६ ०४:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".