नेमकी घटना आणि तपास
दिनांक १२ जुलै २०२६ रोजी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरीचा गुन्हा (गु.र.क्र. १०५/२०२६) दाखल झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार सुरज ओंबासे आणि अमोल वायाळ यांनी अत्यंत बारकाईने तपास सुरू केला. त्यांनी घटनास्थळासह पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील ५० किलोमीटर अंतरातील तब्बल १५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली. या तांत्रिक विश्लेषणातून आरोपींची माहिती समोर आली.
आरोपींची अटक आणि गुन्ह्यांचा उलगडा
आरोपींची अटक आणि गुन्ह्यांचा उलगडा
मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने सापळा रचून तारकेश्वर टेकडीजवळ, ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळ (येरवडा) दोन संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींची नावे सागर संजय शेळके (वय १९, रा. कारेगाव, मूळ रा. कर्जत, जि. अहमदनगर) आणि करण आदिराज धुमाळ (वय २३, रा. कारेगाव, मूळ रा. परळी, जि. बीड) अशी आहेत.
आरोपींकडे केलेल्या कसून चौकशीत त्यांनी चोरीच्या ८ मोटारसायकल (बुलेट, केटीएम, स्प्लेंडर प्लस) लपवून ठेवल्याचे कबूल केले. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत ५,००,००० रुपये आहे. या कारवाईमुळे लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील ३ गुन्हे आणि पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ५ गुन्हे, असे एकूण ८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गित्ते आणि तपास पथकाचे सपोनि निखिल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. या टोळीला गजाआड केल्यामुळे वाहन चोरीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसणार आहे.

Labels: Bike Theft, Pune Police, Yerwada Police, Crime News, Stolen Motorcycles, Arrest.
Search Description: Two individuals arrested by Yerwada Police for stealing expensive bikes like Bullet and KTM. 8 bikes worth 5 lakhs recovered.
Hashtags
#PunePolice #YerwadaPolice #BikeTheft #CrimeUpdate #Justice #PuneNews #StolenBikesRecovered #PoliceAction #MaharashtraPolice #MarathiNews #CrimePatrol
येरवडा पोलिसांची मोठी कामगिरी: बुलेट, केटीएम चोरणाऱ्या दोन सराईतांच्या मुसक्या आवळल्या
Reviewed by ANN news network
on
७/१६/२०२६ ०५:३५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: