नऱ्हे व आंबेगाव भागात सव्वा लाखाचा गुटखा जप्त


पुणे : पुणे शहरातून प्रतिबंधित आणि अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. पुणे शहरातून सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. या आदेशाची कठोर अंमलबजावणी करत अमली पदार्थ विरोधी पथक १ च्या पथकाने नऱ्हे आणि आंबेगाव परिसरात गस्त घालत असताना एका फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे १ लाख ८६ हजार ४९४ रुपये मूल्याचा गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला असून एका तस्कराला जेरबंद करण्यात आले आहे. या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटखा पुरवठा करणारी मोठी साखळी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे.

सविस्तर हकिगत अशी की, दिनांक २० जुलै २०२६ रोजी अमली पदार्थ विरोधी पथक १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक कोतकर आणि इतर पोलीस अंमलदार नऱ्हे व आंबेगाव परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, गस्त सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक कोतकर यांना त्यांच्या एका गोपनीय बातमीदाराकडून अत्यंत खात्रीशीर बातमी मिळाली की, नऱ्हे येथील पॅराडाईज अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये राहणाऱ्या एका इसमाकडे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी उपलब्ध आहे. मिळटलेल्या माहितीनुसार, इसम सुरेश संतोष पुरी, वय ३४ वर्षे, हा आपल्या फ्लॅटमध्ये हा प्रतिबंधित माल साठवून विक्री करत आहे.

सदर बातमीची खात्री पटल्यानंतर पथकाने नमुद ठिकाणी तातडीने छापा टाकून सापळा रचला आणि आरोपी सुरेश संतोष पुरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या तावडीत महाराष्ट्र शासनाने संपूर्णपणे प्रतिबंधित केलेले विविध कंपन्यांचे तंबाखूजन्य पदार्थ व सुपारी सापडली. यामध्ये विमल, आरएमडी, राज निवास पान मसाला, रजनीगंधा, सुवासिक पान मसाला आणि जाफरानी जर्दा यांसारख्या ब्रँड्सचा समावेश होता. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एकूण १ लाख ८६ हजार ४९४ रुपये किमतीचा अवैध माल जप्त केला.

या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम कलम ७(२) व २०(२) आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या कलम ३१(१)(िव) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम ५९ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुणे शहरात हा प्रतिबंधित गुटखा पुरवठा करणारी साखळी नेमकी कुणाकडून चालवली जात होती, याचा कसून तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सदर यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त गुन्हे गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे ३ शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांच्या सूचनांनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक कोतकर व पथकातील अंमलदारांनी पार पाडली आहे.



Labels: Pune Police, Anti Narcotics Cell, Banned Gutkha Seized, Narhe Pune, Crime Branch

Search Description: Pune Police Anti Narcotics Cell Unit 1 raided a flat in Narhe, seizing banned gutkha and tobacco products worth Rs 1,86,494 and arresting one person.

Hashtags: #PunePolice #AntiNarcotics #GutkhaSeized #NarhePune #CrimeNews #MaharashtraPolice
नऱ्हे व आंबेगाव भागात सव्वा लाखाचा गुटखा जप्त नऱ्हे व आंबेगाव भागात सव्वा लाखाचा गुटखा जप्त Reviewed by ANN news network on ७/२३/२०२६ ०८:४२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".