'संजय राऊतांनी १०० जन्म घेतले तरी भाजपचा साधा कार्यकर्ताही फोडू शकणार नाही'; नवनाथ बन यांचे चोख उत्तर
मुंबई: "भारतीय जनता पक्ष हा 'राष्ट्रप्रथम' या भावनेतून आणि राष्ट्रीय धोरण घेऊन चालणारा पक्ष आहे. तुमच्यासारखे स्वार्थाचे राजकारण भाजपा करत नाही. संजय राऊतांनी शंभर जन्म घेतले तरी 'ऑपरेशन कमळ' करणे त्यांना कधीच शक्य नाही," असा घणाघाती प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला आहे
पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. "इतरांना लांडगे, कोल्हे म्हणण्यापेक्षा संजय राऊतांनी आपण भांडूपच्या गाढव नाक्याचे नेतृत्व करतोय हे लक्षात ठेवावे. तिथून उभे राहून तुम्ही जी बडबड करता, त्यामुळे तुम्हाला गाढव नाक्याचेच नेतृत्व शोभते," अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले
यावेळी नवनाथ बन यांनी जुन्या राजकीय घडामोडींची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मुंबई महापालिकेत सत्तेत असताना मनसेचे सात नगरसेवक फोडणाऱ्यांनी राजकारणाचा बाजार कोणी मांडला होता, याचे उत्तर आधी महाराष्ट्राला द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले
शेवटी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बदललेल्या राजकीय भूमिकेवर टीका करताना बन म्हणाले की, संजय राऊत आणि त्यांचा पक्ष केवळ खुर्चीसाठी आपली मूळ विचारधारा, हिंदुत्व आणि स्वधर्म सोडून राहुल गांधींच्या नादी लागला आहे
Labels: Maharashtra Politics, BJP Maharashtra, Navnath Ban, Sanjay Raut, Political Controversy, Mumbai News
Search Description: BJP State Main Spokesperson Navnath Ban strongly criticized Sanjay Raut, stating that even in 100 births, 'Operation Lotus' cannot be replicated or affected by him.
Hashtags: #MaharashtraPolitics #BJP #NavnathBan #SanjayRaut #MumbaiPressConference #PoliticalWar #UddhavThackeray #RajThackeray
Reviewed by ANN news network
on
७/०२/२०२६ ०६:१८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: