पुणे (प्रांतीय वृत्त): पुणे शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या अंतर्गत महामेट्रो तर्फे डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणारा पादचारी केबल ब्रिज तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी भिडे पुलावरील वाहतूक दिवसा व रात्री तात्पुरत्या स्वरूपात आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येणार असून, विश्रामबाग व डेक्कन वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहतूक उप-आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यातील प्राप्त अधिकारांचा वापर करून या तात्पुरत्या स्वरूपातील वाहतूक बदलाचे आदेश निर्गमित केले आहेत. सदर मार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
भिडे पुलावरील वाहतूक दिनांक २२ जून २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ वाजेपासून ते दिनांक ०६ जुलै २०२६ पर्यंत दिवसा व रात्री पूर्ण वेळ बंद राहील. तसेच दिनांक ०७ जुलै २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत फक्त रात्री २३.०० ते सकाळी ०६.०० या वेळेत ही वाहतूक बंद असेल.
वाहतुकीसाठी करण्यात आलेले पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
भिडे पूल मार्गे डेक्कनकडे येणारी व जाणारी वाहतूक: वाहनचालकांनी टिळक चौक ते खंडोजी बाबा चौक मार्गे किंवा नदीपात्र - जयंतराव टिळक पूल - गंधर्व हॉटेल चौक डेक्कन मार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच केळकर रोडने ओंकारेश्वर पूल ते झाशीराणी चौक मार्गे जाता येईल.
भिडे पूल मार्गे नदीपात्र रस्त्याने डी.पी. रोड/कर्वे रोडकडे जाणारी वाहतूक: चालकांनी शास्त्री रोडने गांजवे चौक, एस. एम. जोशी पूल मार्गे इच्छित स्थळी जावे. दुचाकी वाहनांसाठी पूना हॉस्पिटल जवळील 'झेड ब्रिज'चा (Z Bridge) पर्याय खुला राहील.
डेक्कन पीएमटी बस स्टॉप मार्गे केळकर रोडकडे येणारी वाहतूक: ही वाहतूक टिळक चौक आणि खंडोजी बाबा चौक मार्गे इच्छित स्थळी वळविण्यात आली आहे.
नागरिकांनी या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि कर्तव्यावर तैनात असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
Labels: Pune Traffic Updates, Bhide Bridge Closed, Metro Work Pune, Deccan Traffic Diversion, Pune Road Block.
Search Description: Pune Traffic Police announced traffic diversion near Bhide Bridge from June 22 to July 7 due to MahaMetro cable bridge construction work.
Hashtags: #PuneTraffic #TrafficDiversion #BideBridge #MahaMetro #DeccanGymkhana #PuneUpdates #RoadClosure
दिनांक २२ जूनपासून ७ जुलैपर्यंत पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक बंद
Reviewed by ANN news network
on
६/२३/२०२६ ०८:१५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: