
पुणे: शासनाने प्रतिबंधित केलेल्या विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्या एका सराईत तस्कराला पुणे शहरातील कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही धडक कारवाई १७ जून २०२६ रोजी हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील जगताप गोठ्याजवळ करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ६,४५,२३० रुपये किमतीचा अवैध पान मसाला, तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरलेली पांढऱ्या रंगाची बोलेरो (एम.एच.१२ आर.एफ.६२३४) जप्त केली आहे.
कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी उप निरीक्षक आकाश विटे अवैध धंद्यांचा शोध घेत होते. दरम्यान, तपास पथकातील अमलदार गणेश चिंचकर व विजय खेंगरे यांना बातमीदाराकडून गाडीतून गुटख्याची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक भगवान गुरव यांनी पथकासह सापळा रचून रमेश हिरालाल प्रजापती (वय ३५ वर्षे, रा. गोकुळनगर, पुणे) याला ताब्यात घेतले.
कारची झडती घेतली असता त्यात बंदी असलेला गुटखा मिळून आल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-५) राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त (वानवडी विभाग) नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक आकाश विटे, अमलदार अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर, विजय खेंगरे, अनिल बनकर, किशोर पवार, रुपेश पाटील, लक्ष्मण होळकर आणि मयुर मोरे व सुजित मदन यांच्या पथकाने यशस्वी केली.
Labels: Pune Crime, Gutkha Seizure, Pune Police, Yeolewadi Police, Crime News Maharashtra
Search Description: Pune Police seized banned Vimal Pan Masala and tobacco worth over Rs 6.45 Lakhs in Yeolewadi area; one accused arrested with a Bolero car.
Hashtags: #PuneCrime #GutkhaSeized #PunePolice #CrimeNews #Kondhwa #Yeolewadi
कोंढवा-येवलेवाडी पोलिसांची धडक कारवाई; विमल पान मसाला आणि तंबाखूचा मोठा साठा हस्तगत
Reviewed by ANN news network
on
६/२३/२०२६ ०५:२५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
६/२३/२०२६ ०५:२५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: