पुण्यात केमिकल गोदामातील ॲसिड चोरीचा गुन्हा ३ तासांत उघड; ३ आरोपी जेरबंद



पुणे (प्रांतीय वृत्त): धायरी येथील एका गोदामातून लाखो रुपये किमतीचे ऑर्थोफॉस्फरिक ॲसिडचे कॅन चोरणाऱ्या टोळीला नांदेड सिटी पोलिसांनी अवघ्या ३ तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १५,४०,००० रुपये किमतीचे १५४ ॲसिडचे कॅन आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी पिकअप गाडी असा एकूण २०,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धायरी येथील कॅनल शेजारी असलेल्या रिलायबल केमिकल्सच्या गोडाऊनमधून २५ लिटर वजनाचे पांढऱ्या रंगाचे रॅनकेम कंपनीचे ऑर्थोफॉस्फरिक ॲसिडचे कॅन चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी तपास पथकाला आरोपींचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकातील अंमलदार संग्राम शिनगारे, शिवाजी क्षीरसागर आणि मोहन मिसाळ यांनी गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवली. संशयित इसम वैभव चव्हाण हा धायरी येथील मॅपल सोसायटी धायरेश्वर मंदिराजवळ येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने रोहन संतोष इंदुलकर आणि निखिल तानाजी पवार यांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ ३ चे उपायुक्त सागर कवडे आणि सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस, निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत, उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत आणि तपास पथकाने केली.


  • Labels: Pune Crime News, Acid Theft Case, Nanded City Police, Dhayri Theft Case, Chemical Factory Robbery.

  • Search Description: Nanded City police cracked a major chemical theft case within 3 hours, arresting three suspects and recovering Orthophosphoric acid worth lakhs from Dhayri.

  • Hashtags: #PunePolice #CrimeNews #TheftCaseCracked #ChemicalTheft #NandedCityPolice #Dhayri #PuneCrime



पुण्यात केमिकल गोदामातील ॲसिड चोरीचा गुन्हा ३ तासांत उघड; ३ आरोपी जेरबंद पुण्यात केमिकल गोदामातील ॲसिड चोरीचा गुन्हा ३ तासांत उघड; ३ आरोपी जेरबंद Reviewed by ANN news network on ६/२३/२०२६ ०७:३५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".