सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगार 'आकाश सासवडे' नांदेड सिटीजवळ अटकेत!

 


पुणे, दि. १२ जून २०२६: पुणे शहरातील कुख्यात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर, सोमनाथ गायकवाड आणि सुरज ठोंबरे टोळीतील सक्रिय व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांविरुद्ध गुन्हे शाखेने विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत खंडणी विरोधी पथक १ आणि गुन्हे शाखा युनिट २ च्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत सुरज ठोंबरे टोळीतील अट्टल गुन्हेगार आकाश उर्फ स्काय मंगेश सासवडे (वय २७, रा. पंतप्रधान आवास योजना सोसायटी, विंग ए-७, नांदेड सिटी, पुणे) याला देशी बनावटीच्या पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह रंगेहात अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, टोळीतील फरार आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार शहरात मोठा गुन्हा करण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर कडक निगराणी ठेवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार १० जून २०२६ रोजी खंडणी विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि युनिट २ च्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांचे पथक सिंहगड रस्ता व नांदेड सिटी परिसरात पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान पोलीस अंमलदार अमोल आवाड यांना त्यांच्या बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली की, सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगार आकाश उर्फ स्काय सासवडे हा स्वतःच्या कंबरेला विनापरवाना पिस्तूल लावून नांदेड सिटी परिसरातील 'चुल आंगण हॉटेल'जवळ संशयास्पदरीत्या फिरत आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेल परिसरात सापळा लावून अत्यंत शिताफीने आकाश उर्फ स्काय सासवडे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूला कंबरेला खोचलेले चांदी (सिल्व्हर) रंगाचे धातूचे आणि प्लॅस्टिकची काळी मूठ असलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये २ जिवंत काडतुसे आढळून आली. पिस्तुलाच्या परवान्याबाबत विचारले असता त्याने ते मित्राकडून घेतल्याचे सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वी समर्थ पोलीस ठाण्यात ३, बंडगार्डन पोलिसांत १, फरासखाना येथे १ गुन्‍ह्यासह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA-मोक्का) आणि तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पीआय विश्वजीत काईंगडे, पीआय अश्विनी जगताप, एपीआय राजेश माळेगावे, धिरज राऊत आणि अंमलदार फडतरे, आवाड, दांगडे, कांबळे व इम्रान शेख यांनी केली आहे.

 

  • Labels: Anti Extortion Cell Pune, Akash Sky Saswade Arrested, Suraj Thombre Gang, Nanded City Pune Crime, Weapon Seizure Police Raid.

  • Search Description: Pune Crime Branch Anti-Extortion Cell arrested Suraj Thombre gang member Akash alias Sky Saswade with an illegal pistol near Nanded City.

  • Hashtags: #GangWarPune #AntiExtortion #PunePolice #NandedCity #WeaponSeizure #MCOCA

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगार 'आकाश सासवडे' नांदेड सिटीजवळ अटकेत! सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगार 'आकाश सासवडे' नांदेड सिटीजवळ अटकेत! Reviewed by ANN news network on ६/१२/२०२६ १०:२९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".