ही घटना ८ जून २०२६ रोजी रात्री २१:०५ वाजण्याच्या सुमारास मुंबई सेन्ट्रल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ०२ वर घडली होती
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वांद्रे युनिट-०६ च्या तपास पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज अत्यंत बारकाईने तपासले
पोलीस अभिलेखानुसार, अटक करण्यात आलेला आरोपी शुभम दिवाकर हा अत्यंत अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर भायखळा पोलीस ठाण्यात ५, आग्रीपाडा येथे १, सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात १ आणि कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात १ असे एकूण ८ जबरी चोरी व चोरीचे गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत
ही यशस्वी कारवाई लोहमार्ग पोलीस आयुक्त श्री. एम. राकेश कलासागर आणि पोलीस उप आयुक्त (मध्य परिमंडळ) श्रीमती प्रज्ञा जेडगे यांच्या आदेशान्वये, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र रानमाळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत सुळे, आनंद जहागिरदार व अंमलदारांच्या पथकाने केली
Labels: Mumbai Railway Police, Train Chain Snatching, Crime Branch Arrest, Local Train Robbery, Mumbai Central Railway Police, Mahalakshmi Station.
Search Description: Mumbai Railway Police Crime Branch Unit 6 arrested a record criminal Shubham Diwakar for snatching a gold chain worth Rs 2.70 Lakh from a passenger at Mahalakshmi railway station.
Hashtags: #MumbaiLocal #RailwayPolice #ChainSnatching #CrimeBranch #MumbaiCentral #LocalTrainCrime #SecurityUpdate2026
Reviewed by ANN news network
on
६/१५/२०२६ ०७:४८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: