१७ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा बनाव करून खंडणी मागणारे जाळ्यात; पुणे पोलिसांची झारखंडमध्ये मोठी कारवाई


पुणे (प्रांतीय वृत्त): कोंढवा बुद्रुक येथून अपहरण झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची कोंढवा पोलिसांनी रेल्वे पोलीस आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे झारखंडमधील टाटानगर जमशेदपूर येथून सुखरूप सुटका केली आहे. दरम्यान, मुलीच्या अपहरणाचा बनाव रचून मुलीच्या वडिलांना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करत युपीआय (UPI) स्कॅनरद्वारे पैशांची मागणी करणाऱ्या अज्ञात इसमांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळची बिहारची असलेली ही पीडित मुलगी कोंढव्यातील काकडे वस्ती येथे राहत असून, १८ जून रोजी तिला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार कोंढवा पोलिसात दाखल झाली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथक सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत असताना, फिर्यादीच्या मोबाईलवर एका अज्ञात इसमाचा व्हिडिओ कॉल आला. "तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे," असे सांगून त्याने पैशांची मागणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी तात्काळ ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा आणि परिमंडळ ५ च्या उपायुक्तांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. कोंढवा पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून पुणे रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मुलगी हावडा कलकत्ताकडे जाणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये बसल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तात्काळ रेल्वे विभागाशी संपर्क साधून सदर गाडी झारखंडमधील टाटानगर जमशेदपूर येथे पोहोचण्यापूर्वी तिथल्या रेल्वे पोलीस आणि टीसी (TC) यांना मुलीचा फोटो पाठवून सतर्क केले. रेल्वे पोलिसांनी आझाद हिंद एक्सप्रेसमधून मुलीला सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर कोंढवा पोलिसांचे पथक फिर्यादीसह टाटानगर येथे रवाना झाले व मुलीचा ताबा घेतला. ही यशस्वी कारवाई आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त गौहर हसन, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस, निरीक्षक प्रशांत मंडले, उपनिरीक्षक रवींद्र गावडे आणि तपास पथकाने केली.

 

  • Labels: Kidnapping Fake Call, Kondhwa Police Station, Missing Girl Rescued, Tatanagar Railway Police, Online Ransom Case, Cyber Crime Pune.

  • Search Description: Kondhwa police successfully rescued a 17-year-old missing girl from Azad Hind Express at Tatanagar, Jharkhand and booked suspects for making fake ransom video calls.

  • Hashtags: #MissingGirlRescued #FakeKidnapping #KondhwaPolice #CyberCrime #TatanagarRailway #PunePolice #HumanTraffickingAwareness



१७ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा बनाव करून खंडणी मागणारे जाळ्यात; पुणे पोलिसांची झारखंडमध्ये मोठी कारवाई १७ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा बनाव करून खंडणी मागणारे जाळ्यात; पुणे पोलिसांची झारखंडमध्ये मोठी कारवाई Reviewed by ANN news network on ६/२३/२०२६ ०८:१०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".