कामशेत पॅराग्लायडिंग हिलला मोठा दिलासा; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्यानंतर वीजवाहिनीचा मार्ग बदलणार
कामशेत हे भारतातील प्रमुख विमान क्रीडा (अॅव्हिएशन स्पोर्ट्स) आणि पर्यटन केंद्र असून, येथील डोंगररचना आणि वाऱ्याची अनुकूल स्थिती यामुळे वर्षातील आठ ते नऊ महिने येथे व्यावसायिक व मनोरंजनात्मक पॅराग्लायडिंग उड्डाणे चालतात. मात्र, सध्याच्या तांत्रिक आराखड्यानुसार प्रस्तावित असलेल्या वीजवाहिनीचे तीन मोठे टॉवर थेट मुख्य उड्डाण क्षेत्राच्या दोन किलोमीटर लांबीच्या हवाई मार्गात येत होते. या प्रस्तावित पोलमुळे येथील राष्ट्रीय स्तरावरील वैमानिक प्रशिक्षण केंद्र आणि त्यावर अवलंबून असलेला ग्रामीण रोजगार कायमचा धोक्यात आला होता. ही गंभीर समस्या कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय एम आणि उपाध्यक्ष विनोद शेलार यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
सभागृहाबाहेरील या महत्त्वपूर्ण बैठकीत श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय सचिवांना नकाशानुसार केवळ तीन खांबांच्या हट्टापायी तीन दशकांपासून चालणारे राष्ट्रीय केंद्र बंद करणे अन्यायकारक असल्याचे तांत्रिक मुद्द्यांसह पटवून दिले. महाराष्ट्राच्या पायाभूत आणि ऊर्जा विकासाला पूर्ण पाठिंबा देतानाच, या क्रीडा क्षेत्राचे संरक्षण करणेही तितकेच गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर केंद्रीय सचिव पंकज अग्रवाल यांनी सहमती दर्शवत ऊर्जा, पर्यटन, क्रीडा विभाग, स्थानिक प्रशासन आणि विमान क्रीडा प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीचे आयोजन करण्याचे मान्य केले. मुख्य उड्डाण क्षेत्राला पूर्णपणे टाळणारा सुधारित पर्यायी मार्ग निश्चित करून कामशेतची स्थानिक आर्थिक व्यवस्था अबाधित ठेवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Labels:
Kamshet Paragliding Hill,Shrirang Barne MP,Maval Tourism Protection,Ministry Of Power Survey,High Voltage Transmission LineSearch Description: MP Shrirang Barne met Power Secretary Pankaj Agarwal to demand a route change for the 765 KV power line obstructing the Kamshet paragliding site.
Hashtags: #KamshetParagliding #ShrirangBarne #MavalTourism #PowerMinistry #AviationSports #AstraNewsNetwork
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: