धुळे, दि. ४ जून २०२६: महाराष्ट्र शासनाच्या किमान आधारभूत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्याने आणलेल्या ज्वारीचा दर्जा चांगला दाखवून त्याचे ऑनलाईन बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५,००० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. मनीष महेश बागुल (वय ३० वर्षे, पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक, रा. साईछत्र अपार्टमेंट, पेठ रोड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. ही धडक कारवाई ३ जून २०२६ रोजी धुळे येथील शासकीय गोदामात करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २४१/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (भ.प्र. कायदा) कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, धुळे जिल्ह्यातील मौजे अंचाडे येथील एक शेतकरी (तक्रारदार) आणि त्यांच्या पत्नीने रब्बी हंगाम २०२५-२६ अंतर्गत शेतात पिकवलेली ज्वारी शासकीय खरेदी केंद्रावर विकण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. नोंदणीनुसार, ३ जून २०२६ रोजी तक्रारदार आपली ज्वारी घेऊन धुळे येथील शासकीय गोदामात गेले होते. तेथे ज्वारीच्या मालाची मोजणी झाल्यानंतर मोजमापाच्या पावत्या देण्यात आल्या. मात्र, केंद्रावर हजर असलेला गोदाम व्यवस्थापक मनीष बागुल याने शेतकऱ्याला बाजूला नेऊन, "तुमच्या ज्वारीचा दर्जा चांगला दाखवून मोजणी करून देतो, त्याचे ५,००० रुपये द्यावे लागतील; अन्यथा ऑनलाईन बिल मंजुरीसाठी पुढे पाठवणार नाही," अशी थेट धमकी दिली.शेतकऱ्याची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने, त्यांनी तत्परता दाखवत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), धुळे कार्यालय गाठून मनीष बागुलविरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली. 'एसीबी'च्या पथकाने शासकीय गोदामात पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी बागुल याने शेतकऱ्याकडे ५,००० रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्यास मान्यता दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 'एसीबी'ने गोदामातच अत्यंत गोपनीयतेने सापळा रचला. गोदाम व्यवस्थापक मनीष बागुल याने तक्रारदार शेतकऱ्याकडून ५,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली, त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या 'एसीबी'च्या पथकाने त्याला रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या.
सदरची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेंडे आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे 'एसीबी'चे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे आणि सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांनी पूर्ण केली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांच्यासह अंमलदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितीश चौधरी, चंद्रकांत सैदाणे, सागर माळी आणि सुधीर मोरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Labels: ACB Raid Dhule, Manish Bagul Arrested, Corruption Case Maharashtra, Dhule Tahsil Office Scam, Jowar Procurement Bribery, Anti Corruption Bureau News.
Search Description: Dhule Anti-Corruption Bureau (ACB) caught supply inspector and godown manager Manish Mahesh Bagul red-handed while accepting a bribe of Rs 5,000 from a farmer.
Hashtags: #DhuleACB #AntiCorruptionBureau #BriberyCase #DhuleNews #MaharashtraGovernance #FarmersRights #ZeroTolerance
Reviewed by ANN news network
on
६/०४/२०२६ ०१:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: