बुधवार, २४ जून, २०२६

शनिनगर चौकातून चोरली होती दुचाकी; आंबेगाव पोलिसांनी अजय जावीरला ठोकल्या बेड्या



पुणे: केवळ स्वतःच्या मौजमजेसाठी शहराच्या विविध भागांतून मोटारसायकल चोरणाऱ्या २९ वर्षीय आरोपीला आंबेगाव पोलिसांनी २४ जून २०२६ रोजी जांभूळवाडी तलावाजवळून अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरीच्या एकूण तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आंबेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना ही कारवाई करण्यात आली.

मिळालेली माहिती अशी की, २० जून २०२६ रोजी आंबेगाव पोलीस ठाण्याचे पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार सचिन गाडे व प्रमोद भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. आंबेगाव पोलीस ठाणे गु.र. नं २८४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) मधील चोरीस गेलेली मोटारसायकल घेऊन अजय मर्याप्पा जावीर (वय २९ वर्षे, रा. दुर्गामाता मंदिराच्या मागे, हनुमाननगर, शनिनगर, जांभूळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) हा जांभूळवाडी तलावाजवळ बसला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे व अंमलदार यांनी तात्काळ जांभूळवाडी तलावाजवळील मोकळ्या जागेत जाऊन सापळा रचला. तेथे संशयितरीत्या मोटारसायकलवर बसलेल्या अजय जावीरला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. त्याने ही मोटारसायकल १४ जून २०२६ रोजी शनिनगर चौकातील हरिओम हार्डवेअर समोरून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी ती मोटारसायकल जप्त करून अधिक कसून चौकशी केली असता, त्याने भारती विद्यापीठ आणि पुणे स्टेशन परिसरातूनही दुचाकी चोरल्याचे मान्य केले. त्याच्याकडून एकूण तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर कारवाई अप्पर आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, उप-आयुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे यांच्या सूचनेप्रमाणे उपनिरीक्षक युवराज शिंदे, अंमलदार चेतन गोरे, हणुमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे, शिवाजी पोटोळे व फिरोज शेख यांच्या पथकाने केली आहे.


  • Labels: Pune Police, Bike Thief Arrested, Ambegaon Police Station, Pune Crime, Vehicle Theft Pune

  • Search Description: Ambegaon Police arrested a 29-year-old bike thief Ajay Muryappa Javir from Jambhulwadi lake area and seized three stolen motorcycles.

  • Hashtags: #PunePolice #CrimeNewsPune #BikeThief #Ambegaon #VehicleSeized #MaharashtraPolice

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा