पुणे, २५ मे २०२६:पुणे शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने हांडेवाडी परिसरात एक मोठी कारवाई केली आहे. गणपती मंदिराच्या मागे, सातवनगर, हांडेवाडी रोड येथील मोकळ्या जागेत चारचाकी वाहनात आणि झाडीझुडपात लपवून ठेवलेला तब्बल ५ लाख २३ हजार रुपये किमतीचा अवैध गावठी हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुनील हरी कचरावत (वय ५० वर्षे, रा. गणपती मंदिराजवळ, सातवनगर, हांडेवाडी रोड, पुणे) या इसमाला रंगेहात ताब्यात घेतले आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, २४ मे २०२६ रोजी काळेपडळ पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान पोलीस अंमलदार नितीन ढोले व गिरिराज जगदाळे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम सातवनगर येथील मोकळ्या जागेत स्वतःच्या चारचाकी वाहनात गावठी हातभट्टी दारूचा साठा करून त्याची बेकायदेशीर विक्री करत आहे. ही माहिती तपास पथकाचे अधिकारी सपोनि अमित शेटे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांना दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.या छाप्यात पोलिसांना एका सँट्रो कार (क्र. एम.एच.१२/डि.एस./४०८०) मध्ये आणि आजूबाजूच्या झाडाझुडपात लपवून ठेवलेले प्रत्येकी ३५ लिटरचे एकूण ७० प्लास्टिकचे ड्रम सापडले, ज्यात २४५० लिटर गावठी हातभट्टी दारू भरलेली होती. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल आणि सँट्रो कार जप्त केली आहे. आरोपी सुनील कचरावत याच्याविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. २३८/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.
सदर यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ६) श्री. जीवन बेनीवाल, सहायक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) श्री. अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार सपोनि अमित शेटे, अंमलदार प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतीक लाहगुडे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे आणि गिरिराज जगदाळे यांच्या पथकाने केली.
Labels: Pune Liquor Raid, Kalepadal Police Station, Illicit Liquor Seized, Handewadi Road Pune, Maharashtra Prohibition Act, Crime News Pune, Santro Car Seized.
Search Description: Kalepadal Police in Pune seizes 2450 liters of illicit country-made liquor worth Rs 5.23 Lakhs from a Santro car at Handewadi Road.
Hashtags: #PunePolice #LiquorRaid #CrimeNews #Handewadi #KalepadalPolice #IllegalLiquor #PuneUpdates
Reviewed by ANN news network
on
५/२८/२०२६ ०९:५३:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: