महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज अधिक गतिमान आणि सक्षम करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व तयारी २०२६ अंतर्गत अतिवृष्टी, पूरस्थिती, पाणी साचणे, झाडे पडणे किंवा अन्य कोणत्याही दुर्घटनांच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही प्रशिक्षित यंत्रणा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. याअंतर्गत शासनमान्य संस्थांकडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले ५० 'आपदा मित्र' स्वयंसेवक, राज्य अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण दलातील अनुभवी तरुणांची मानधन तत्त्वावर नेमणूक केली जाईल.
हे स्वयंसेवक नियुक्तीच्या दिनांकापासून पुढील पाच महिन्यांच्या कालावधीसाठी कार्यरत राहतील. त्यांना कामगार कल्याण विभागाकडील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन दरानुसार मानधन दिले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देणे, बचावकार्यात मदत करणे आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे ही या स्वयंसेवकांची मुख्य जबाबदारी असेल.
या बैठकीस विधी समिती सदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, उपायुक्त संदीप खोत आणि मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Labels: PCMC, Disaster Management, Aapda Mitra, Monsoon Preparation, Pimpri Chinchwad, Local Government Decisions.
Search Description: PCMC Legal Committee approves the experimental appointment of 50 trained Aapda Mitra volunteers for 5 months to strengthen disaster management during the 2026 monsoon.
Hashtags: #PCMC #AapdaMitra #DisasterManagement #PimpriChinchwad #MonsoonReady #SafetyFirst #MaharashtraNews
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२६ ०९:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: