मुंबई/मिरा-भाईंदर (प्रतिनिधी): मिरा-भाईंदर येथील राज्य सरकारची एक इंचही जमीन बिल्डरच्या घशात जाऊ दिली जाणार नाही आणि यासाठी सरकार थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देईल, अशी ग्वाही भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी दिली. "कुठल्याही बिल्डरला पाठीशी घालायला हे काही महाविकास आघाडीचे किंवा उद्धव ठाकरे-संजय राऊत यांचे सरकार नाही," अशा कडक शब्दात त्यांनी विरोधकांवर तोफ डागली.
मिरा-भाईंदर रोड प्रकरणाबाबत बोलताना श्री.
बन यांनी स्पष्ट
केले की, महसूल
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
यापूर्वीच सरकारची भूमिका जाहीर केली
आहे. पत्रा चाळ
घोटाळ्याप्रमाणेच
या प्रकरणातील दोषींनाही तुरुंगात धाडले
जाईल. सरकार न्यायालयात पूर्ण
शक्तीनिशी लढेल आणि विजय
मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त
केला. यावेळी त्यांनी संजय
राऊत यांच्यावर न्यायालयाचा अपमान
केल्याचा आरोप केला. सोयीनुसार न्यायालयाच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे
हा राऊतांचा ढोंगीपणा असल्याचे त्यांनी नमूद
केले.
महाविकास आघाडीच्या काळातील कारभारावर टीका
करताना नवनाथ बन
म्हणाले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना
१०० कोटी रुपयांच्या वसुलीची परंपरा
होती. कोविड काळात
प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम
याच आघाडीने केले."
तसेच सुवेंदू अधिकारी यांच्यावरील टीकेला
उत्तर देताना त्यांनी संजय
राऊत यांना त्यांच्या स्वतःच्या जेलवारीची आठवण
करून दिली.
इंडिया
आघाडीतील अंतर्गत वादावर भाष्य करताना
बन यांनी दावा
केला की, राहुल
गांधी आणि संजय
राऊत यांच्या नेतृत्वातील आघाडीत
फूट पडली आहे.
तामिळनाडूत काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे सांगत,
भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबतही असेच
घडेल, असे भाकीत
त्यांनी केले. "बाळासाहेब ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे,
काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा आपले
दुकान बंद करण्याची वेळ
आता उद्धव ठाकरे
गटावर आली आहे,"
असा टोलाही त्यांनी लगावला.
Labels: BJP Maharashtra, Navnath Ban, Mira Bhayander Land Case,
Sanjay Raut, Political News, Maharashtra Government.
Search Description: BJP State Chief Spokesperson Navnath Ban asserts that not
an inch of government land in Mira-Bhayander will be given to builders.
Criticizes MVA and Sanjay Raut over corruption and legal issues.
Hashtags: #NavnathBan #BJP #MaharashtraPolitics #MiraBhayander
#SanjayRaut #LandScam #LegalBattle
"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: