शुक्रवार, ८ मे, २०२६

पुणे: महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शाळांची दहावीत यशस्वी भरारी

 


पुणे:महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुणे कॅम्प येथील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (आझम कॅम्पस) शाळांनी घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेच्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल आणि एम.सी..एस. इंग्लिश मिडीयम स्कूल या तिन्ही शाळांनी निकालाची उच्च परंपरा कायम राखली असून, यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शाळानिहाय निकालाचा तपशील:

. अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल: या शाळेचा निकाल ९९.६० टक्के लागला आहे. तसवीब आदिल शेख हिने ९०.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

. अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल: शाळेचा एकूण निकाल ९८.१४ टक्के लागला. यामध्ये उर्दू माध्यमात मोहम्मद अली मोहम्मद शफीक शेख (८१.२० टक्के) तर इंग्रजी माध्यमात मोहम्मद सकलेन इरफान (८७.८० टक्के) यांनी आपापल्या विभागात प्रथम क्रमांक पटकावला.

. एम.सी..एस. इंग्लिश मिडीयम स्कूल: शाळेचा निकाल ९८.२८ टक्के लागला असून अल अमीन साकिब बोगदी याने ८९ टक्के गुणांसह शाळेत अव्वल स्थान प्राप्त केले.

मान्यवरांकडून अभिनंदन

विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आबेदा इनामदार आणि सचिव प्रा. इरफान शेख यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रोशन आरा शेख, बॉईज हायस्कूलचे मुख्याध्यापक राज मुजावर आणि इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. असफिया अन्सारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाला आणि शाळेच्या शिस्तबद्ध अध्यापनाला या यशाचे श्रेय देण्यात आले आहे.



·         Labels: Pune Education News, SSC Result 2026, Azam Campus Pune, MCES Society, Student Achievements, Education Excellence.

·         Search Description: Maharashtra Cosmopolitan Education Society (Azam Campus, Pune) schools record stellar results in SSC Class 10th examinations. Anglo Urdu Girls High School leads with 99.60%.

·         Hashtags: #SSCResult #PuneEducation #AzamCampus #MCES #AngloUrduSchool #StudentSuccess #PuneNews

·      



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा