मुंबई: भारतीय जनता पार्टीने काढलेल्या महिलांच्या विराट आक्रोश मोर्चामुळे संजय राऊत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या धास्तीतूनच त्यांनी महिला शक्तीवर टीका करताना जातीवाचक शब्दांचा वापर करून विशिष्ट समाजाचाही अपमान केला आहे. नारीशक्तीचा अपमान करणाऱ्यांना देशातील महिला आगामी काळात निश्चितच धडा शिकवतील, असा घणाघाती प्रहार भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या धोरणांवर कडक शब्दांत टीका केली.
पंतप्रधान मोदी देशभक्तच
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख 'दहशतवादी' असा केला आणि संजय राऊत यांनी त्याचे समर्थन केले, यावरून नवनाथ बन यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी दहशतवादी नाहीत, तर ते १४० कोटी जनतेचे आशीर्वाद लाभलेले देशभक्त आणि प्रधानसेवक आहेत. ज्यांनी पुलवामा घटनेचे समर्थन केले, त्यांना मोदी दहशतवादी वाटत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. भारतीय सैन्याने आणि मोदी सरकारने दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्याचे काम केले आहे."
लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध
संजय राऊत सातत्याने महिला मोर्चाला पैसे देऊन लोक बोलावल्याचा आरोप करत आहेत. यावर बोलताना बन म्हणाले की, "पैसे देऊन माणसे गोळा करणे ही उबाठा गटाची संस्कृती आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राऊत हे सातत्याने १५०० रुपयांचा उल्लेख करून 'लाडकी बहीण' योजनेचा विरोध करत आहेत. महिलांना हे पैसे मिळू नयेत, अशीच त्यांची धारणा आहे."
महिला आरक्षणावरून कोंडी
संजय राऊत आणि महाविकास आघाडीने महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून सामान्य महिलांना संसदेत जाण्यापासून रोखले आहे, असा आरोपही बन यांनी केला. "जर महिलांच्या हातात सत्ता आली, तर आपल्याला भ्रष्टाचार करता येणार नाही आणि पत्रा चाळीसारखे घोटाळे उघड होतील, या भीतीनेच संजय राऊत आणि त्यांच्या मित्रपक्षांनी महिला आरक्षणाला विरोध केला आहे. राहुल गांधींच्या महिलाविरोधी धोरणांमुळेच जनतेने त्यांना सलग तीन निवडणुकांमध्ये नाकारले आहे," असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Metadata in English:
Labels: Maharashtra Politics, BJP vs Shiv Sena UBT, Navnath Ban, Sanjay Raut, PM Modi, Women's Rights, Political Controversy.
Search Description: BJP State Chief Spokesperson Navnath Ban slams Sanjay Raut for his derogatory remarks on women and support for calling PM Modi a terrorist.
Hashtags: #MaharashtraPolitics #BJP #SanjayRaut #NavnathBan #NariShakti #PMModi #LadkiBahin #NewsMaharashtra #PoliticalWar #MumbaiNews
Reviewed by ANN
on
४/२२/२०२६ ०४:५७:०० PM
Rating:
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: