पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामे पाडली


 



पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या नियोजनबद्ध विकासाला खीळ घालणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर महापालिकेने गेल्या तीन दिवसांपासून धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. १५ ते १७ एप्रिल २०२६ या कालावधीत शहरातील 'ब', 'क', 'इ', 'ग' आणि 'फ' या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत ४६ बेकायदा बांधकामे आणि पत्राशेड निष्कासित करण्यात आले. या कारवाईद्वारे प्रशासनाने एकूण ४५ हजार २८९ चौरस फूट क्षेत्रफळावरील अतिक्रमण हटविले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते आणि सार्वजनिक जागा व्यापणाऱ्या अनधिकृत पत्राशेडवर हातोडा टाकण्यात आला. 'ब' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिंचवडमधील प्रभाग क्र. १८ मध्ये सर्वाधिक म्हणजे २१,७९८ चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यात आले.

​भोसरी आणि पुणे-नाशिक महामार्ग परिसरात 'क' क्षेत्रीय कार्यालयाने ३ आरसीसी बांधकामांसह ७ पत्राशेडवर कारवाई करून सुमारे ३,८०० चौरस फूट जागा मोकळी केली. मोशी आणि डूडूळगाव परिसरातही १ अनधिकृत पत्राशेड पाडण्यात आले. चिखली परिसरात ८ व्यावसायिक बांधकामे निष्कासित करण्यात आली, तर रहाटणी आणि थेरगाव (ग कार्यालय) परिसरात सलग तीन दिवस चाललेल्या मोहिमेत १५ हजारांहून अधिक चौरस फूट अतिक्रमण काढण्यात आले.

​ही कारवाई अत्यंत कडेकोट बंदोबस्तात पार पडली. यासाठी जेसीबी ब्रेकर, ट्रॅक्टर ब्रेकर यांसारख्या अवजड यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. क्षेत्रीय अधिकारी राजाराम सरगर, अजिंक्य येळे, तानाजी नरळे, अतुल पाटील आणि किशोर ननवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलीस कर्मचारी आणि एम. एस. एफ. जवानांच्या मदतीने ही मोहीम यशस्वी केली.

​दरम्यान, शहरातील अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहील आणि बेकायदा कृत्य करणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Metadata in English:

Labels: PCMC News, Anti-Encroachment Drive, Pune Local News, Pimpri Chinchwad Municipal Corporation, Illegal Construction Demolition.

Search Description: PCMC launched a massive anti-encroachment drive across five regional offices, demolishing 46 illegal structures and clearing over 45,000 sq. ft. of area from April 15 to 17, 2026.

Hashtags: #PCMC #PimpriChinchwad #AntiEncroachment #PuneNews #IllegalConstruction #DemolitionDrive #VijaySuryavanshi #MunicipalAction


पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामे पाडली पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामे पाडली Reviewed by ANN news network on ४/१९/२०२६ ०९:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".