बोपखेल, रामनगर उद्यानात अत्याधुनिक व्यायामाची सुविधा

 


पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून बोपखेल गावातील रामनगर उद्यानामध्ये नागरिकांसाठी अत्याधुनिक आणि आकर्षक ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक १४/१०/२०२५ रोजी या नवीन जिम साहित्याचे पूजन भाग्यदेव घुले यांच्या प्रयत्नातून करण्यात आले.

हा उपक्रम रामनगर आणि गणेशनगर भागातील नागरिकांना समर्पित करण्यात आला आहे. या प्रकल्पामागे नागरिकांमध्ये व्यायामाची सवय, फिटनेसबाबत जागरूकता आणि आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. लहान वयातच शारीरिक सक्रियतेची गोडी लागल्यास ती आयुष्यभर टिकून राहते, या हेतूने हे जिम उभारले गेले आहे.

 यावेळी बोलताना बबन घुले (अध्यक्ष, हरि ॐ ज्येष्ठ नागरिक संघटना) म्हणाले; "आजच्या जगात केवळ श्वास घेणे, खाणे किंवा झोपणे पुरेसे नाही; तर दररोज थोडासा व्यायाम किंवा शारीरिक हालचाली केल्याने आपले शरीरच नव्हे तर आपले मनही निरोगी राहते. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे."

कार्यक्रमास हरि ॐ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी, विंध्याचल संस्था रामनगरचे अध्यक्ष प्रदिप गुप्ता, दिनेश सिंग, गुरुद्वाराचे रामसिंग गिल, शिव मल्हार स्थापना समितीचे सर्व सदस्य आणि गणेशनगर, रामनगर, बोपखेल भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख संतोष महादेव गायकवाड यांनी केले.


Labels: Open Gym, Bopkhel, Ramnagar Udyan, Public Initiative, Community Fitness 

Search Description: An open gym, installed through the efforts of Shri Bhagya Dev Ghule, was inaugurated at Ramnagar Udyan in Bopkhel village, Pimpri-Chinchwad, aiming to promote fitness and a healthy lifestyle among local residents. 

Hashtags: #OpenGym #Bopkhel #Ramnagar #PimpriChinchwad #Fitness #CommunityInitiative

बोपखेल, रामनगर उद्यानात अत्याधुनिक व्यायामाची सुविधा बोपखेल, रामनगर उद्यानात अत्याधुनिक व्यायामाची सुविधा Reviewed by ANN news network on १०/१५/२०२५ ०९:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".