'निःस्वार्थ देशसेवा हीच संघाची शिकवण' - सारंग पापळकर

 


पिंपरी: "गेल्या शंभर वर्षांपासून संघाचे स्वयंसेवक निःस्वार्थ भावनेने देशातील नैसर्गिक आपदा, युद्ध परिस्थिती तसेच आधुनिकीकरणामुळे येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी तत्पर असतात. निःस्वार्थ देशसेवा हीच संघकार्याची शिकवण आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा प्रचार प्रमुख श्री. सारंग पापळकर यांनी केले.

ते पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पिंपरी नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवा बोलत होते. यावेळी चिंचवड गटाचे संघचालक प्रतापराव जाधव, प्रमुख अतिथी नामदेवराव महानवर आणि नगर कार्यवाह उमेश भामरे व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. पापळकर पुढे म्हणाले की, संघ शाखेच्या माध्यमातून चारित्र्य संपन्न माणूस घडविला जातो आणि शाखेतून घडलेली माणसे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत राष्ट्र सर्वोपरी या भावनेने कार्यरत आहेत. त्यांनी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या कार्याचा गौरव करून सांगितले की, संपूर्ण हिंदू समाज संघटन करीत असताना लक्षावधी सेवाकार्य स्वयंसेवकांनी समाज सहभागातून सुरू केली आहेत.

शताब्दी वर्षात संघाने लक्ष केंद्रित केलेल्या कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्व बोध, स्वदेशी, नागरी कर्तव्ये या विषयांवर त्यांनी माहिती दिली आणि संपूर्ण समाजाने यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या प्रसंगी पारंपारिक शस्त्रपूजन, शारीरिक प्रात्यक्षिके, घोष वादन आणि सांघिक गीत सादर करण्यात आले. या उत्सवाला स्वयंसेवकांसह परिसरातील अनेक नागरिक, महिला, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Labels: RSS, Vijaya Dashami, Pimpri, Rashtriya Swayamsevak Sangh, Social Service

Search Description: The Rashtriya Swayamsevak Sangh's Vijaya Dashami festival in Pimpri Nagar was celebrated enthusiastically. Sarang Papalkar, the district publicity chief, emphasized that "Selfless service to the nation is the teaching of the Sangh," and urged people to join the 'Shakha' to understand its work.

Hashtags: #RSS #VijayaDashami #Pimpri #RashtriyaSwayamsevakSangh #Pune #DeshSeva


'निःस्वार्थ देशसेवा हीच संघाची शिकवण' - सारंग पापळकर 'निःस्वार्थ देशसेवा हीच संघाची शिकवण' - सारंग पापळकर Reviewed by ANN news network on ९/२८/२०२५ १०:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".