मराठी निर्मात्यांशी भागीदारी करा; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे नेटफ्लिक्सला आवाहन (VIDEO)

 


मुंबई, १ ऑगस्ट २०२५: महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी नेटफ्लिक्स या आघाडीच्या ओटीटी (OTT) व्यासपीठाला मराठी आशय निर्माते आणि मराठी मनोरंजन उद्योगासोबत भागीदारी करण्याचे आवाहन केले आहे.

शेलार यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात लॉस एंजेलिस येथील नेटफ्लिक्स कॉर्पोरेशनच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी बोलताना, ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठीला स्थान मिळत नाही, अशी खंत व्यक्त करणाऱ्या मराठी मनोरंजन उद्योगातील निर्मात्यांची बाजू त्यांनी मांडली.   

यावेळी आशिष शेलार यांनी नेटफ्लिक्सने मराठीमध्ये आशय निर्मिती सुरू केल्यास राज्यशासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले.   


Ashish Shelar, Netflix, Marathi Content, OTT Platform, Maharashtra Government, Entertainment Industry, Cultural Affairs Minister, IT Minister, Los Angeles.

#AshishShelar #Netflix #MarathiContent #OTT #Maharashtra #EntertainmentIndustry #CulturalAffairs #ITMinister

मराठी निर्मात्यांशी भागीदारी करा; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे नेटफ्लिक्सला आवाहन (VIDEO) मराठी निर्मात्यांशी भागीदारी करा; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे नेटफ्लिक्सला आवाहन (VIDEO) Reviewed by ANN news network on ८/०१/२०२५ ११:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".