आपत्कालीन प्रसंगी जलद आणि शिस्तबद्ध प्रतिसादासाठी महापालिकेचा उपक्रम
आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर शिकवण्यावर भर
महापालिका अधिकारी म्हणाले, 'हे धोरणात्मक पाऊल'
पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन विभागात नव्याने नियुक्त झालेल्या जवानांसाठी आधुनिक साधनांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि शिस्तबद्ध प्रतिसाद देण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरले, असे महापालिकेने सांगितले.
या प्रशिक्षण सत्रात अग्निशमन जवानांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची ओळख करून देण्यात आली. यामध्ये फायर होजचा योग्य वापर, पाणी व फोम टेंडरची हाताळणी, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागणारी आधुनिक तंत्रे, तसेच संघभावना आणि आपत्कालीन निर्णयक्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आला. यासोबतच सिलेक्टेबल गॅलॉन नोझल, हाय-प्रेशर डिस्चार्ज नोझल, पोर्टेबल ऑसिलेटिंग मॉनिटर, इम्पॅक्ट टूल सेट अशा अनेक अत्याधुनिक साधनांचा वापर प्रात्यक्षिकांसह शिकवण्यात आला.
यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी, 'केवळ आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देणे पुरेसे नाही, तर त्याच्या प्रभावी वापरासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण आवश्यक आहे. हे सत्र भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी घेतलेले धोरणात्मक पाऊल आहे,' असे सांगितले. सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे आणि उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनीही या प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले.
Pimpri-Chinchwad
Firefighters
Training
Emergency Response
Modern Equipment
#PCMC #Firefighters #Training #EmergencyResponse #PimpriChinchwad #Safety

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: