बीड जिल्ह्याने केला विक्रम; एकाच दिवशी ३० लाख रोपे लावली

 


 'इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद

बीड, (प्रतिनिधी): हवामान बदल आणि वाढत्या प्रदूषणामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. बीड जिल्ह्याने एकाच दिवशी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड करून 'इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये विक्रम प्रस्थापित केला आहे. याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 'हरित बीड अभियाना'त सहभागी झालेल्यांचे कौतुक केले आहे.

'हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र' अभियानांतर्गत 'हरित बीड अभियान'चा शुभारंभ पालकमंत्री पवार यांच्या हस्ते खंडेश्वरी मंदिर परिसरात रोपाची लागवड करून करण्यात आला. या अभियानांतर्गत जिल्ह्यात एकाच दिवशी ३० लाख रोपांची लागवड करण्यात आली, ज्याची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये घेण्यात आली. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'चे प्रतिनिधी अशोक अदक यांनी पालकमंत्र्यांना प्रमाणपत्र आणि पदक सुपूर्द केले.

अजित पवार म्हणाले की, या रोपांचे संवर्धन आणि संगोपन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. जिल्हा प्रशासनाने वर्षभरात एक कोटी रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला असून, तो पूर्णत्वास नेण्याचे आवाहन त्यांनी केले. शासनाने आगामी चार वर्षांत १०० कोटी रोपांची लागवड करण्याचे ध्येय ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, प्रकाश सोळंके यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही बीड जिल्ह्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि 'सीट्रीपलआयटी'च्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.


  • Beed

  • Indian Book of Records

  • Ajit Pawar

  • Tree Plantation

  • Harit Beed Abhiyan

 #Beed #TreePlantation #IndianBookOfRecords #AjitPawar #HaritMaharashtra #Environment #Maharashtra

बीड जिल्ह्याने केला विक्रम; एकाच दिवशी ३० लाख रोपे लावली बीड जिल्ह्याने केला  विक्रम; एकाच दिवशी ३० लाख रोपे लावली Reviewed by ANN news network on ८/०८/२०२५ ०१:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".