पिंपरी-चिंचवड शहरात पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; आपत्कालीन मदत पथके तैनात
पवना, मुळा आणि मुठा नद्यांमध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व यंत्रणांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात पाऊस सुरू असून, पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पवना धरण ९७% भरले असून, धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी ५,६६० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्याचप्रमाणे, मुळशी धरणातून ५,००० क्युसेक आणि खडकवासला धरणातून ९,६५९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, नदीपात्रात उतरू नये आणि आपली जनावरे व शेतीची अवजारे सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र - ९९२२५०१४७५
भोसरी अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७६
प्राधिकरण अग्निशमन केंद्र - ९९२२५०१४७७
चिखली अग्निशमन केंद्र – ८६६९६९४१०१
थेरगाव अग्निशमन केंद्र – ७०३०९०७९९९
रहाटणी अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७८
मोशी अग्निशमन केंद्र – ७२६४९४३३३३
तळवडे अग्निशमन केंद्र - ९५५२५२३१०१
Pimpri-Chinchwad
Heavy Rain
River Discharge
Shekar Singh
Flood Alert
#PCMC #PimpriChinchwad #FloodAlert #RiverDischarge #Monsoon2025 #PuneRains

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: